Headlines

दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार? सूचक विधान करत म्हणाल्या “मी प्रतिक्षेच्या…” | Shivsena Thackeray Faction Deepali Sayyed on Joining Eknath Shinde Faction sgy 87

[ad_1]

शिवसेनेमध्ये दोन गट पडले असल्याने नेत्यांसबोत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही आपण नेमका कोणाला पाठिंबा द्यावा याबाबत संभ्रम असल्याचं दिसत आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात असला, तरी अद्याप त्याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही. यादरम्यान दोन्ही गटांमध्ये पक्षप्रवेश सुरु असून आपली बाजू भक्कम असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. दीपाली सय्यद यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सूचक विधान केलं असल्याने, त्या शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि त्याआधीही दीपाली सय्यद प्रचंड सक्रीय झाल्याचं चित्र दिसत होतं. अनकेदा त्यांनी विरोधकांवर जाहीरपणे टीका केली असून, सडेतोड उत्तरही दिलं. ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठीही त्या प्रयत्न करत होत्या. पण पक्षात सुषमा अंधारे यांचा प्रवेश झाल्यापासून दीपाली सय्यद फारशा सक्रीय झालेल्या दिसत नाहीत. याचं नेमकं कारण विचारण्यात आलं असता त्यांनी ‘मी स्क्रीनवर येऊन तू-तू मै-मै करत नाही. जेव्हा गरज होती तेव्हा मी केली,” असं सांगितलं.

“मोदींची गाडी असती तर तीदेखील फोडली असती”; दीपाली सय्यद यांचं वक्तव्य; म्हणाल्या “बाळासाहेबांनी शिवसैनिकांना…”

तुम्ही सध्या शांत का आहात? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की “सुषमाताई नुकत्याच आल्या असून त्यांना आपण शिवसेनेत आल्याचं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. शिवसेनेत काम करताना मला आता साडे तीन वर्षं झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या तरच तुम्ही राजकारणात सक्रीय आहात असा समज करण्याची गरज नाही. मी कामंही केली पाहिजेत. जी लोक कामं करतात त्यांना पाठिंबा दिला तरच ती पूर्ण होतात”.

“दोघे एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती आणि त्यासाठी मी वाट पाहत होती. एकत्र आले तर आपलं बळ वाढेल असं मला वाटत होतं. कार्यकर्त्यांवर या गोष्टीचा फार परिणाम होत आहे. जे कार्यकर्त्यांसोबत काम करतात त्यांनाच हे जाणवतं,” असंही त्यांनी सांगितलं.

“प्रत्येकजण आपापली मतं मांडत आहेत. प्रत्येकाने आपला गट निर्माण केला आहे. लवकरच माझाही गट दिसेल,” असं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं. सध्या मी शिवसेनेत आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेसह आहात का? असं विचारण्यात आलं असता मी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचं त्यांनी म्हटलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *