Headlines

Dhanashree Verma सोशल मीडियावर होतेय ट्रोल, ‘हे’ आहे कारण

[ad_1]

मुंबई : देशभरात गुरूवारी 13 ऑक्टोबर रोजी करवा चौथ (Karwa Chauth Vrat) साजरा करण्यात आला. बॉलिवूड अभिनेत्रींसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हा सण साजरा करून सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री वर्माने (Dhanashree Verma) देखील हा उपवास ठेवला होता. या संदर्भातले फोटो व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या पोस्टनंतर तिला आता ट्रोल केलं जातेय.  

धनश्री वर्माने (Dhanashree Verma) देखील युजवेंद्र चहलसाठी (Yuzvendra Chahal) करवा चौथचा उपवास ठेवला होता. मात्र यावेळेस तिची अडचण झाली होती. युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup)  स्क्वाँडमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे चहल ऑस्ट्रेलियात तर धनश्री भारतात होती. त्यामुळे हा उपवास कसा सोडावा असा प्रश्न तिच्यासमोर होता. 

हे ही वाचा : टीम इंडियाच्या T20 स्क्वाँडमधून डावललं, स्टार खेळाडूने ठोकली Fastes Fifty

सद्यपरीस्थितीत समोरा समोर उभं राहून हा उपवास सोडता येत नसल्याने धनश्रीने (Dhanashree Verma) एक शक्कल लढवली. धनश्रीने चहलला व्हिडिओ कॉल करत हा उपवास सोडला. धनश्रीने आधी चंद्र पाहिला आणि नंतर चहलला लाईव्ह व्हिडिओ चॅटवर पाहून पाणी पिऊन उपवास सोडला, अशा प्रकारे तीने हा सण साजरा केला. 

धनश्रीने या संपूर्ण लाइव्ह व्हिडिओ चॅटचा एक वेगळा व्हिडिओही बनवला आणि तो इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर होताच चाहत्यांनी धनश्री आणि चहलला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

धनश्रीच्या (Dhanashree Verma) व्हिडीओ पोस्टवर युझर्सनीही जोरदार कमेंट केल्या आहेत. एका युझरने लिहले की, आजकाल दिखावा जास्त झाला आहे.दुसऱ्या युझरने लिहले की, ‘… त्यांना सांगा हे सर्व काम जगाला न दाखवताही करता येते. त्यामुळे धनश्री आणि चहल चांगलेच ट्रोल झाले होते. 

याआधी चहलने (Yuzvendra Chahal) एक पोस्ट टाकून धनश्रीला करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.चहलने धनश्रीचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये धनश्री नववधूसारखी दिसत होती. एका फोटोत धनश्रीच्या (Dhanashree Verma) हातात मेहंदीही दिसली होती. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये चहलने लिहिले की, करवा चौथच्या शुभेच्छा पत्नी. तुझ्यावर प्रेम आहे.
 
दरम्यान धनश्री वर्माने (Dhanashree Verma) शेअर केलेल्या व्हिडिओवरून दोघेही सोशल मीडियावर ट्रोल होतायत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *