Headlines

धम्माल मनोरंजनाची झणझणीत मेजवानी! ‘लंडन मिसळ’ चित्रपटाचा टीझर एकदा पाहाच

[ad_1]

Landon Misal Teaser : ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसल लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून भरत जाधव एका अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. चित्रपटाचा धमाकेदार टिजर नुकताच लाँच करण्यात आला आहे. जगन्नाथरावांच्या भूमिकेत भरत जाधव, अदितीच्या भूमिकेत ऋतुजा बागवे,रावीच्या भूमिकेत रितिका श्रोत्री तसंच गौरव मोरे आणि माधुरी पवारच्या मजेदार सीनची झलक दाखवणारा लंडन मिसळ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांमध्ये रिलीजची उत्सुकता निर्माण करतोय.

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या दोन बहिणींचं आयुष्य जग्गनाथरावांच्या एका नियमामुळे बदलून जातं.. आणि मग सुरु होतो मजेदार प्रसंगांचा धमाल खेळ…’लंडन मिसळ’ या चित्रपटातून मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि रितिका श्रोत्री दोघीही टीझरमध्ये हटके अंदाजात दिसत आहेत. तर हरहुन्नरी नट भरत जाधव यांच्या विनोदी अभिनयाची फोडणी चित्रपटाला अधिक मनोरंजक बनवणार हे टिजर पाहूनच कळतंय. गौरव मोरे नेहमीप्रमाणे त्याच्या छोट्याशा झलक मधून भाव खाऊन गेलाय तर माधुरी पवारचा टीझरमध्ये दिसलेला एकच संवाद लक्ष वेधून घेतोय.

आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रेरित आहे, हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य. 

हेही वाचा : फेक ब्लॉकबस्टर? ‘सुपर डुपर हिट हा प्रकार राहिलाच नाही’, Tiger 3 वर का भडकले मनोज देसाई?

‘लंडन मिसळ’ या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत, सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत तर सहयोगी निर्मात्या वैशाली पाटील या आहेत. दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे तर पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. वैशाली सामंत,रोहित राऊत,वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे तर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं ‘लंडन मिसळ’ चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे.  तसेच चित्रपटाची गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि  समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वैशाली सामंंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी आपल्याला ‘लंडन मिसळ’ चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे.चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन  फ़िल्मअस्त्रा स्टुडिओज करत आहेत. आता 8 डिसेंबरला विनोदाचा धमाका अनुभवण्यास सज्ज रहा.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *