Headlines

devendra fadnavis in bjp melava mocks shivsena uddhav thackeray

[ad_1]

महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर आता शिंदे गट आणि भाजपा यांच्या निशाण्यावर मुंबई महानगर पालिका असून पालिकेवर युतीचा भगवा फडकवण्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पक्षाच्या नेतेमंडळींनी महाविकास आघाडीवर टीका करताना पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. यावेळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या डायलॉगबाजीने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!

नेमकं घडलं काय?

देवेंद्र फडणवीसांच्या आधी आशिष शेलार यांचं भाषण झालं. यावेळी शेलार यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट अमिताभ बच्चन यांची उपमा दिली. “देवेंद्र फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती है”, असं आशिष शेलार यांनी म्हणताच उपस्थित भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्याला हसून दाद दिली.

फडणवीसांची डायलॉगबाजी!

दरम्यान, आशिष शेलार यांच्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांनी देखील याच डायलॉगबाजीची री ओढत स्वत: देखील शोले चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. “मघाशी माझा उल्लेख झाला. हे मला अमिताभ बच्चन म्हणतात. माझं शरीर अमजद खानसारखं आहे आणि हे मला अमिताभ बच्चन म्हणतात”, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी फडणवीसांनी कली.

“आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला!

दरम्यान, मागे बसलेल्या आशिष शेलार यांनी शोले चित्रपटातल्या गब्बर सिंगचा “कितने आदमी थे” हा डायलॉग म्हणताच फडणवीसांनी त्यावर खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. “हो, हे मी विचारू शकतो. कितने आदमी थे? ६५ मे से ५० निकल गए और सबकुछ बदल गया. लेकिन, अब दो ही बचे है..पण त्यांचाही सन्मान आहे. आम्ही विरोधकांचा सन्मानच करतो”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *