Headlines

Devendra fadanvis gave clarification to Bhaskar Jadhav about act 137 in vidhansabha session

[ad_1]

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधानसभा अधिनियम कलम १३७ च्या वापराबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभेत शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी या कलमाअंतर्गत विधेयक दुरुस्तीवरील चर्चेवर मर्यादा येत असल्यावर भाष्य केलं. “विधेयकावर मर्यादीत चर्चा व्हावी, मात्र विधेयकावर चर्चारोध आणण्याचा कलम १३७ खाली विचार करू नये”, अशी विनंती भास्कर जाधव यांनी केली.

नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास? डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले का ? भुजबळांच्या मिश्किल प्रश्नांनी आरोग्यमंत्र्यांची भंबेरी

एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी कलम १३७ खाली विधेयकावरील चर्चा कशी थांबवली आणि त्यानंतर हा निर्णय कसा बदलला, याची आठवण यावेळी भास्कर जाधवांनी सभागृहाला करून दिली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. विधेयकांसदर्भात चर्चारोध मांडलेला नाही, असे स्पष्टीकरण यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिले. सभागृहात कुणालाच बोलायची मनाई नाही. मात्र चर्चेचे स्वरुप राजकीय झाल्यास कलम १३७ ची आठवण करून देणं आमचं कर्तव्य असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

अजित पवारांनंतर आता रोहित पवारांवर निशाणा, ट्वीट करत मोहित कंबोज म्हणाले, “बारामती ॲग्रो कंपनीचा…”

दरम्यान, ठाण्यातील दिवामध्ये आयोजित शिवसेनेच्या कार्यक्रमात भास्कर जाधवांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. शिंदे सरकार भाजपाच्या हातातली कळसूत्री बाहुली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. सरकार स्थापनेनंतर सर्वच निर्णय भाजपाला अपेक्षित असलेले घेण्यात आले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *