Headlines

Deepika Padukone की Priyanka Chopra सोनेरी मोनोकिनीमध्ये कोण दिसतं जास्त सुंदर? चाहत्यांमध्येच वाद

[ad_1]

Deepika Padukone and Priyanka Chopra in Golden Monokini : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) वाढदिवसानिमित्त त्याचा आगामी चित्रपट ‘पठाण’चा (Pathan) टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. निर्मात्यांनी नुकतंच चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.  या गाण्याचं नाव बेशरम असं आहे. शाहरुखनं गाणं प्रदर्शित झाल्याची बातमी देत दीपिकाचा (Deepika Dadukone) सोनेरी मोनोकिनीतील फोटो शेअर केला आहे. दीपिकाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

दीपिकाचा हा लूक पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांना 2008 च्या ‘दोस्ताना’ चित्रपटातील प्रियंका चोप्राच्या लूक आठवला आहे. या दोन्ही लूक्समध्ये साम्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. खरंतर ‘दोस्ताना’ या चित्रपटातील जाने क्यूं या गाण्यात प्रियांकानं सोनेरी रंगाची मोनोकिनी परिधान केली होती. योगायोगाने दोन्ही गाणी विशाल-शेखर या जोडीने संगीतबद्ध केली आहेत. (Priyanka Chopra in Monokini) 

पाहा काय म्हणाले नेटकरी 

दीपिकाचा लूक पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, “फायर ब्रिगेडला कॉल करा कारण दीपिकानं आग लावली आहे.” यावर प्रतिक्रिया देत दुसरा नेटकरी म्हणाला “हो! दीपिका खूपच हॉट दिसते पण प्रियंका 2008 मध्ये गोल्डन बिकिनीमध्ये सुंदर दिसली होती.”

या  गाण्याबद्दल बोलताना ‘पठाण’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणाले की, “हो, हे खरं आहे की आमच्या चित्रपटाचं पहिलं गाणे सोमवारी रिलीज झालं असून त्याचे नाव बेशरम रंग आहे आणि यात दोन मोठे स्टार पाहायला मिळणार आहे. आताच पिढीतील सर्वात मोठे स्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण त्यांच्या सर्वात हॉट अंदाजात दिसणार आहेत.”

सिद्धार्थ आनंद यांचे शेवटचे दोन चित्रपट ‘बँग बँग’ आणि ‘वॉर’ हे अॅक्शन ब्लॉकबस्टर होते. ते पुढे म्हणाले, ‘आमच्यासाठी, हे एक गाणं एक पार्टी सॉंग आहे ज्याची प्रतिक्षा प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून करत होते आणि मला विश्वास आहे की ते एक पार्टी अँथम राहील. येत्या अनेक वर्षांसाठी त्यामुळे मी चाहते आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हे गाणे सोमवारी सकाळी रिलीज होईल!’

हेही वाचा : “मेरा सोना, बाबू…” करूनही आकाशनं केलं ब्रेकअप, वंशिकाची स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, ‘पठाण’ या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) त्याच्या ‘टायगर’ (Tiger) चित्रपटातील लूकमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *