Headlines

deepak kesarkar replied to aditya thackeray citicism in andheri east bypoll spb 94

[ad_1]

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दोन्ही गटाकडून टीका-टीप्पणी करण्यात येत आहे. दरम्यान, आज दोन्ही उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी ही निवडणूक ‘माणुसकी विरुद्ध खोकासूर’ अशी असल्याचे विधान केले होते. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Andheri Bypoll: “जास्त म्याव म्याव केलं तर…,” नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना जाहीर इशारा, उद्धव ठाकरेंवरही गंभीर आरोप

दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?

“ही निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना-भाजपा युती अशी आहे. मुरजी पटेल हे स्थानिक उमेदवार आहेत. आजच्या रॅलीला जमलेली गर्दी बघून त्यांची लोकप्रियता किती आहे, याचा अंदाजा येईल. आदित्य ठाकरेंकडून केवळ साहनुभूतीचे राजकारण सुरू आहे. आमचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठण्यालाही तेच जबाबदार आहेत”, असे प्रत्त्युतर दीपक केसरकर यांनी दिले आहे.

हेही वाचा – Andheri East Bypoll Election Live : “त्यांना तेवढीही अक्कल नसेल, तर…”, शिवसेनेची भाजपावर सडकून टीका, वाचा लाईव्ह अपडेट्स…

“मनपाच्या नियमांमध्ये लटके यांचा राजीनामा मान्य होणार नाही, हे ठाकरे गटाला माहिती होते. त्यामुळे त्यांनी हा सर्व डाव रचला होता. न्यायालयाचा आदेश नीट वाचला तर लक्षात येईल की, हे ठाकरे गटाचे षडयंत्र होते”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “भुजबळ बाळासाहेबांबद्दल काय काय बोलत होते…”, मुख्यमंत्रीपदावरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला!

आदित्य ठाकरेंनी काय टीका केली होती?

ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरताना महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली होती. “ज्याप्रकारे ही निवडणूक होत आहे, त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात राग आणि दु:ख आहे. एखाद्या महिलेला सतवणं किती योग्य आहे? महापालिका आणि खोके सरकार ऋतुजा लटके निवडणूक कशा लढणार नाहीत यासाठीच प्रयत्न करत होते. पण कोर्टाने त्यांना दणका दिला आहे. सर्व निष्ठावंत सैनिक आज येथे आले असून, महाविकास आघाडीचे घटकही आले आहेत. खरं तर अशा निवडणुकींमध्ये विरोधी उमेदवार देणं योग्य नसतं. पण त्या परिस्थितीतही खोके सरकारने जे खेळ केले त्यातून त्यांचं काळं मन समोर आलं आहे. ‘माणुसकी विरुद्ध खोकासूर’ अशीच ही लढाई झाली आहे,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *