Headlines

डेटिंग शोनं ओलांडल्या मर्यादा; बोलण्यास मनाई, मात्र एक रात्र ‘एकत्र’ घालवण्याची संधी

[ad_1]

मुंबई : रिअॅलिटी शो म्हटलं, की त्याचं स्वरुप कसं असणार, इथपासून या शोममध्ये स्पर्धक नेमकं काय करताना दिसणार इथपर्यंतची उत्सुकता चाहत्यांना असते. सध्या मात्र अशा एका शोची चर्चा सुरु आहे, ज्याचं एकंदर स्वरुप पाहता प्रेक्षकांनाही घाम फुटत आहे. 

आतापर्यंत डेटिंगशी संबंधित बरेच रिअॅलिटी शो तुम्ही पाहिले असतील. पण, हा शो जरा वेगळा आहे. जरा म्हणण्यापेक्षा बराच वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, इथं घनदाट जंगलात अगदी खुल्लम खुल्ला प्यार करण्याची मुभा दिली जाते. (dating show love in the jungle crossed all the limits gives chance of intimacy)

बसला ना धक्का? या रिअॅलिटी शोचं नाव आहे Love In The Jungle. आधुनिक काळातील प्रेम, रोमान्स, डेटिंग आणि इंटिमसी यावर हा शो आधारित आहे.  इथं स्पर्धक एकमेकांशी असणारं नातं आणखी घट्ट करत त्यांच्यातील जवळीकही साधताना दिसत आहेत. 

बोलून नव्हे, वावरण्यातून व्यक्त करतात भावना 
या शोची संकल्पना ‘अॅनिमलिस्टिक मेटिंग रिचुअल्स’वर आधारित आहे. ज्यामुळं सुरुवातीचे 4-5 भाग स्पर्धकांना एकमेकांशी संवाद साधण्याची मुभा नव्हती. पण, तुम्हाला जर कोणी आवडत असेल तर हे मात्र तुम्हाला वागण्यातूनच व्यक्त करावं लागत होतं. 

मिठी, Kiss किंवा इंटिमसीच्या माध्यमातूनच स्पर्धक भावना व्यक्त करु शकत होते. बरं इथं एकाच वेळी देण्यात आलेल्या टास्कनुसार महिला स्पर्धक दोन मुलांसोबतही डेटवर जाऊ शकते त्यांच्याशी जवळीकही साधू शकते. 

आता धक्काच बसेल 

तुम्हाला जाणून धक्का बसेल, की या शोमध्ये मुला- मुलींना अर्थात महिला आणि पुरुष स्पर्धकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत एक रात्र व्यतीत करण्याचीही संधी देण्यात येते. या रिअॅलिटी शोमध्ये कॅमेरासमोरच स्पर्धक एकमेकांशी जवळीक साधताना मर्यादा ओलांडताना दिसतात. 

https://www.youtube.com/watch?v=ZPkknqmB5p0

काही स्पर्धक तर, थेट कॅमेरासमोरच कपडेसुद्धा बदलतात. अतिशय बोल्ड आणि वाईल्ड अशा या कार्यक्रमाच्या संकल्पनेमुळं तो चर्चेत तर आला, मात्र त्याला फारसं यश मिळू शकलं नाही. तुम्ही या कार्यक्रमाचा एखादा भाग पाहिलाय का ?



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *