Headlines

दारोदारी Condoms विकतेय अभिनेत्री; कधी एकेकाळी बोल्डनेससाठी होती खास ओळख

[ad_1]

मुंबई : घायाळ करणारं रुप, मादक नजर आणि खिळवून ठेवणारं हास्य अशी एकंदर ओळख असणारी एक लोकप्रिय अभिनेत्री सध्या जे काही करतेय हे पाहून सर्वांनाच हादरा बसत आहे. एकाएकी ची गल्लीबोळातून लोकांची दारं ठोठावत आहे. जत्रांमध्ये जात एखाद्या सेल्स गर्लप्रमाणं काहीतरी विकताना दिसत आहे. (Bollywood Actress)

ती काय विकतेय माहितीये ? दारोदारी जात, भडाभडा प्रोडक्टची माहिती देत ही अभिनेत्री कंडोम विकत आहे. (Condoms)

सोशल मीडियावर ती कंडोम विकतानाचा व्हिडीओ व्हायरलही झाला आहे. ज्यामुळं काही नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. सेल्सगर्ल होत कंडोमचं महत्त्वं समजवणारी ही अभिनेत्री आहे, नुसरत भरुचा. (Actress nushrratt bharuccha trolled for promoting condoms in the film )

नुसरत हे असं का करत आहे, तिला दुसरी कामं नाहीत का? असे असंख्य प्रश्न सोशल मीडियावर तिला विचारण्यात आले. पण, हा सर्व घाट घातला गेला आहे तो म्हणजे तिच्या आगामी चित्रपटासाठी. 

‘जनहित में जारी’ (Janhit Mein Jaari) असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव असून, चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नुसरतनंही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा ट्रेलर शेअर केला. 

‘एका सेल्सवुमची गोष्ट.. जिच्यामुळं विचार करण्याची पद्धत बदलेल’, असं कॅप्शन तिनं ट्रेलरच्या या पोस्टमध्ये लिहिलं. 

अवघ्या काही क्षणांचा हा ट्रेलर पाहताना नुसरतनं त्यात निभावलेली भूमिका सर्वांचीच मनं जिंकून जात आहे. भारताच्या वाढत्या लोकसंख्येचा संदर्भ देत या ट्रेलरची सुरुवात होते आणि पुढे कंडोम विकणारी नुसरत आपल्या नजरेस पडते. 

एका वेगळ्या कथानकाला हाताळत नुसरत नव्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिकेसाठी तयार होत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. तिच्या या आगामी चित्रपटाला आता किती लोकप्रियता मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *