Headlines

वादग्रस्त जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसलेंनी मागितली स्वेच्छानिवृत्ती

[ad_1]

सोलापूर : जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे शिक्षकपदाची स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. अमेरिकेत प्रदीर्घ अध्ययन रजा मंजुरीच्या मुद्यावर डिसले हे वादग्रस्त ठरले असून त्याबाबत झालेल्या चौकशीत ते दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावरील प्रशासकीय कारवाई प्रलंबित आहे.

ग्रामीण शालेय विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत क्यूआर कोड शिक्षण प्रणाली विकसित करून जागतिक पातळीवर पोहोचलेले आणि डिसेंबर २०२० मध्ये युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा सात कोटी रूपयांचा जागतिक शिक्षक पुरस्कार मिळविलेले सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले हे प्रकाशझोतात आले होते. नंतर अमेरिकेतील फुलब्राईट अभ्यासवृत्ती डिसले यांना जाहीर झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ अध्ययन रजा मागितली होती. परंतु जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्याबाबतची रीतसर कागदपत्रे डिसले यांनी मागणी करूनही शेवटपर्यंत कोणतीही कागदपत्रे सादर केली नव्हती. उलट, शिक्षण विभागात शैक्षणिक संशोधनासाठी अमेरिकेत जाण्याकरिता रजा मंजुरीसाठी लाच मागितली, अधिकारी आपला मानसिक छळ करतात, असा गंभीर आरोप डिसले यांनी केला होता. तेव्हा तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्तक्षेपानंतर डिसले यांना तब्बल १५३ दिवसांची प्रदीर्घ अध्ययन रजा मंजूर झाली होती. तथापि, त्यांनी केलेल्या आरोपाची चौकशी सुरू असता डिसले यांनी आपण केलेले आरोप खरे नसून भावनेच्या भरात केलो होतो, असा पवित्रा घेतला होता.

दरम्यान, जागतिक शिक्षक पुरस्कार मिवण्यापूर्वी डिसले यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागातून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत तीन वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. मात्र ते जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत रुजू झाल्याची नोंद कोठेही आढळून आली नाही. त्या दरम्यान, त्यांना नियमित पगारही अदा झाला होता. या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले असता शिक्षण विभागाच्या पाच अधिकाऱ्यांच्या समितीने डिसले यांची चौकशी केली होती. यात ते मोठ्या प्रमाणात दोषी असल्याचा अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांच्याकडे सादर झाला होता. या चौकशीची फेरपडताळणी होऊन शेवटी डिसले यांच्या विरोधात कारवाईबाबतचा अहवाल जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सादर झाला होता. त्यावर अद्यापि कोणतीही कारवाई झाली नाही.

या पार्श्वभूमीवर डिसले यांनी अचानकपणे गट शिक्षणाधिका-यांकडे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दुजोरा दिला आहे. मात्र डिसले यांनी सादर केलेला स्वेच्छानिवृत्ती अर्ज मंजूर होणार की त्यांच्यावर प्रलंबित असलेल्या कारवाईचा बडगा उगारला जाणार, याकडे शैक्षणिक क्षेत्रासह सर्वांचे लक्ष वेधले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *