Headlines

commonwealth games 2022 medalist in Maharashtra got raise in prize money by Maharashtra shinde fadanvis government

[ad_1]

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळांडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेमध्ये राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना ५० लाख, रौप्य पदक विजेत्यांना ३० लाख तर कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना आत्ता २० लाखांचं बक्षिस मिळणार आहे. याशिवाय प्रशिक्षकांना देखील तीन लाखांऐवजी १२ लाख देण्यात येणार आहेत. येत्या २९ ऑगस्टला जागतिक क्रीडा दिनाचं औचित्य साधून पदक विजेत्या खेळाडूंना ही बक्षिसाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे.  

Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेमधील भारताच्या यशाचे गमक काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

याआधी राज्य सरकारकडून सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना अनुक्रमे साडेबारा लाख, सात लाख आणि पाच लाखांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये नुकतीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकुण ६१ पदकांसह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानी आहे.

विश्लेषण: राष्ट्रकुलसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून खेळाडू बेपत्ता का होतात? ‘ही’ आहेत कारणे

या स्पर्धेत महाराष्ट्रातील १४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातील सात जणांनी पदकांची कमाई केली आहे. हरियाणाच्या खेळाडूंनी सर्वाधिक २४ पदकं मिळवली आहेत. दिल्ली आणि झारखंडने प्रत्येकी आठ, तेलंगणा सहा, केरळ, तमिळनाडूने अनुक्रमे चार आणि पाच, मणिपूर आणि उत्तराखंडच्या खेळाडूंनी प्रत्येकी तीन पदकं जिंकली आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *