Headlines

cm eknath shinde commented on Hyderabad muktisangram program and ambadas danve

[ad_1]

हैदराबादमध्ये आयोजित ‘हैदराबाद राज्य मुक्तीसंग्राम’कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील उपस्थितीवरुन शिंदे यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. कुठे राजकारण करायचे हे विरोधकांनी ठरवले पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. विरोधी पक्षांना घोषणाबाजीशिवाय दुसरे कुठले काम नाही, असाही टोला शिंदेंनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना लगावला आहे. “एकनाथ शिंदे दिल्लीच्या पातशाहांच्या आदेशावरून निर्णय घेतात आणि त्यांच्या आदेशावरूनच हैदराबादला जातात” अशी टीका करत शिवसेनेचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदेना लक्ष्य केले होते.

मुख्यमंत्र्यांनंतर शिवसेनेनं पुन्हा केलं ध्वजारोहण; मराठवाडा मुक्तीसंग्राम कार्यक्रमावरून वाद पेटला!

‘वेदान्त-फॉक्सकॉन’यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरुन विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. “मोठे उद्योग तातडीने स्थलांतरीत होत नाहीत. आधीच्या सरकारच्या काळात योग्य मदत न मिळाल्याने हा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. आमचे सरकार येताच याबाबत आम्ही तातडीने बैठका घेत पत्रव्यवहार केला”, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात किती उद्योगांना विरोध झाला, किती उद्योगांचे स्थलांतर झाले, याचा लेखाजोखा लवकरच मांडणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत. विरोधकांच्या आरोपांना कामाने उत्तर देऊ, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

“दिल्लीच्या पातशहांसाठीच…”,मराठवाडा मुक्तीसंग्राम कार्यक्रमावरून शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड!

दरम्यान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी संयुक्तरित्या ‘हैदराबाद राज्य मुक्तीसंग्राम’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील हजेरी लावली होती. राज्यातही औरंगाबादेत ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ साजरा करण्यात आला. सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केले. या कार्यक्रमानंतर हैदराबादेतील कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यावरुन विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम कार्यक्रमाची वेळ बदलल्याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून पुन्हा एकदा सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *