Headlines

chhota rajan brother hemanchand more clarification on narayan rane alligation spb 94

[ad_1]

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषद घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी “उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी शकील, छोटा राजन यांना सुपारी दिली होती”, असा आरोप गंभीर आरोप केला होता. दरम्यान, नारायण राणेंच्या या आरोपाचे छोटा राजनचा मामेभाऊ हेमचंद्र मोरे यांनी खंडन केले आहे.

हेही वाचा – “…म्हणूनच एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचं मोठं धाडस केलं”; अजित पवारांनी सांगितलं कारण

काय म्हणाले हेमचंद्र मोरे?

“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी छोटा राजनबाबत केलेल्या वक्तव्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी केलेले विधान पडताळून पाहणे गरजेचे आहे. जर असे कृत्य झाले असते, तर नारायण राणे यांनी तेव्हाच अशी तक्रार दाखल केली असती. मात्र, अशी कोणतीही तक्रार दाखल नाही”, अशी हेमचंद्र मोरे यांनी दिली आहे.

“छोटा राजनवर जे आरोप आहेत. त्याचे खटले सध्या न्यायालयात सुरू आहेत. असे असताना राजकीय पुढारी छोटा राजन यांच्या नावाचा वापर करून एकमेकांना लक्ष करण्याचा प्रयत्न करू नये”, अशी विनंतीही त्यांनी राजकीय नेत्यांना केली आहे.

हेही वाचा – ‘उद्वव ठाकरेंनी माझी सुपारी दिली’ म्हणणाऱ्या नारायण राणेंना शिवसेनेचं चार शब्दांत प्रत्युत्तर; म्हणाल्या “कृपया…”

काय म्हणाले होते नारायण राणे?

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. “मला मारण्यासाठी शकील, छोटा राजन यांना सुपारी दिली होती. काय झालं मारलं का कोणी? मी जिवंत आहे. मी तुम्हाला पुरून उरेन. आता तुम्ही एकनाथ शिंदेवर बोलताय, काय तर म्हणे पदं दिली. उपकार नाही केले. ही शिवसेना वाढवली कोणी, टिकवली कोणी, सत्तेपर्यंत आणली कोणी? केवळ शिवसैनिकांनीच”, असा आरोप नारायण यांनी केला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *