Headlines

“छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत, अवमान सहन करणार नाही.” ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विनोद पाटलांचा इशारा | vinod patil warns will not tolerate insult of chhatrapati shivaji maharaj after tirupati balaji viral video

[ad_1]

आंध्र प्रदेशमधील तिरुमाला येथे जात असताना कारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्यामुळे चेकपोस्टवरुन पुढे जाऊ दिले नसल्याचा दावा एका व्यक्तीने केला होता. तसा व्हिडीओ या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेचा मराठी आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी निषेध व्यक्त केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. आम्ही हा अवमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा >>> आमची ताकद येणाऱ्या काळात दाखवून देऊ” चंद्रकांत हंडोरेंचा काँग्रेसला इशारा

“छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा मिळावी या भावनेतून शिवभक्त शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्या वाहनामध्ये बसवतात तसेच त्याची पूजा करतात. मात्र तिरुपती बालाजी येथे जात असताना काही शिवभक्तांना अडवण्यात आले. ही मूर्ती तुमच्या वाहनात असेल तर तुम्हाला आम्ही प्रवेश देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे सर्वप्रथम तिरुपती बालाजी येथील प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो,” अशी भूमिका विनोद पाटील यांनी मांडली.

हेही वाचा >>> “कितीही आमदार, खासदार फुटू देत, आम्ही उद्धव ठाकरें सोबतच”; नाशिक- मालेगावचे माजी नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुखांच्या भेटीला

“राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावं. शिवाजी महाराज हे विश्वाचे दैवत आहेत. शिवाजी महाराजांची मूर्ती काढायला सांगणारे आपण कोण, असे विचारले पाहिजे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे तिरुपती बालाजी संस्थानवर निमंत्रित सदस्य आहेत. ते जाताना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काढून गेले का? त्यांनी तिरुपती बालाजी संस्थानचे सदस्य म्हणून प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. अन्यथा त्यांनी तत्काळ राजीमाना दिला पाहिजे,” अशी मागणी विनोद पाटील यांनी केली.

हेही वाचा >>> “तुमची बेसूर पिपाणी बंद करा,” संजय राऊतांवर भाजपाची बोचरी टीका

“आम्हाला वाद करायचा नाही. हिंदू देवस्थान आमचेही आहे. आम्हालाही तेथे गेल्यानंतर समाधान मिळते. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यांना आम्ही सोबत नेऊ शकत नसू तर यापेक्षा दुर्दैवी घटना नाही. भारत सरकारनेही यामध्ये लक्ष घालावं. अन्यथा आमच्या भावाना आम्ही कोणत्या पद्धतीने व्यक्त करु, हे आम्हालाही माहिती नाही,” असेही विनोद पाटील म्हणाले.

हेही वाचा >>> “मी फोन करत होतो पण…” फडणवीसांनी केला आरोप; राऊत म्हणाले “हा तर हा खोटारडेपणाचा कळस”, सरकार स्थापनेवरून पुन्हा घमासान

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमके काय आहे?

सुरेश पाटील नावाच्या व्यक्तीने २२ जून रोजी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी “मी आज तिरुपतीहून तिरुमाला येथे जात होतो. मात्र चेकपोस्टवर माझी कार चेक करण्यात आली. तसेच आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती कारमधून काढण्यास सांगितले. नाही काढली तर तुम्ही कार वरती नेऊ शकत नाही, असे मला तेथील अधिकाऱ्याने सांगितले. मी त्यांना विनंती केली पण त्यांनी नकार दिला,” असा दावा सुरेश पाटील या व्यक्तीने केला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *