Headlines

chandrashekhar bawankule slams uddhav thackeray andheri election

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आधी भाजपानं उमेदवार दिल्यावरून आणि नंतर उमेदवार माघारी घेतल्यावरून विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. सध्या उमेदवार मागे घेतल्यामुळे भाजपानं मैदानातून पळ काढल्याचं ठाकरे गटाकडून म्हटलं जात असताना त्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, उद्धव ठाकरेंना त्यांनी २०१४च्या निवडणुकांबाबत आव्हानही दिलं आहे.

अंधेरी पोटनिवडणूक चर्चेत का?

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांच्याविरोधात भाजपानं उमेदवार उभा केल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली होती. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा दाखला देत अशा वेळी बिनविरोध निवडणूक होऊ द्यायला हवी, असं ठाकरे गटाकडून सांगितलं जात होतं. राज ठाकरेंसह खुद्द शिंदे गटातीलही काही मंडळींनी ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, अशी भूमिका मांडल्यानंतर अखेर भाजपानं उमेदवार मागे घेतला.

“शरद पवार बोलले ती स्क्रिप्ट होती का?”

आधी उमेदवार देऊन नंतर तो माघारी घेतल्यामुळे भाजपावर टीका होत असताना त्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरे गटावर तोंडसुख घेतलं आहे. “शरद पवार जे बोलले, ती स्क्रिप्ट होती का? शरद पवारांनी महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास याचा दाखला दिला. त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला विनंती केली होती. राज ठाकरेंनीही विनंती केली होती. शरद पवारांच्या बोलण्यात भाजपानं उमेदवार मागे घेण्याबाबत विचार करण्याचा संदर्भ होता. मग शरद पवार जे बोलले, ती स्क्रिप्ट होती का?” असा सवाल चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.

देवेंद्र फडणवीसांना अरविंद सावंत यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “जर पाऊस तुमच्या कंट्रोलमध्ये नसतो तर…”!

“उद्धव ठाकरे उलट आमच्यावर बोंबा मारतायत”

“उद्धव ठाकरेंनी तर उलट त्यावर प्रतिक्रियाही दिली होती की शरद पवार योग्य बोलत आहेत, भाजपानं त्यांची संस्कृती पाळायला हवी वगैरे. पण जेव्हा आम्ही संस्कृती पाळली, दिवंगत आमदाराच्या पत्नीला मदत करण्याचा प्रयत्न केला तर ते उलट आमच्यावर बोंबा मारत आहेत”, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

“माझं संरक्षण काढलं आणि दोन तासांत…”, भास्कर जाधवांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप!

“२०२४मध्ये तुम्हाला दिसेल की अंधेरीत..”

“आधी शरद पवार आणि खुद्द उद्धव ठाकरे बोलल्यानंतरही पुन्हा तेच असं म्हणतायत की पळपुटं धोरण स्वीकारलं. माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे. २०१४मध्ये अंधेरीच्या निवडणुकीत आमचा उमेदवार प्रचंड ताकदीने जिंकून येईल. अंधेरीत काय होईल ते तुम्हाला २०२४मध्ये दिसेल”, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *