Headlines

central railway train derail on nagpur bhusawal route near badnera malkhed spb 94

[ad_1]

दिवाळीच्‍या दिवशी नागपूर-भुसावळ मार्गावरील मालखेडनजीक कोळशाच्‍या मालगाडीचे २० डबे रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणत्याही स्वरुपाची जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे ५६ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १२ रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत, तर इतर गाड्यांचा मार्ग वळवण्‍यात आला आहे. सध्या रेल्वेकडून बचावकार्य सुरू आहे. रेल्वे मार्ग अद्याप पूर्ववत झालेला नाही. हा अपघात रविवारी मध्‍यरात्रीच्‍या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना मालखेड ते टिमटाला रेल्‍वे स्थानकांदरम्‍यान घडली. येथे मालगाडीचे २० डबे रुळावरून घसरले. स्थानिक रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर लगेचच विभागाचे कर्मचारी आणि तंत्रज्ञ घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले.

हेही वाचा – यवतमाळ : क्षुल्लक वादातून प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार; हल्ल्यानंतर प्रियकराची आत्महत्या

अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सुमारे ५६ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या अपघातामुळे नागपूर ते बडनेरा आणि बडनेरा ते नागपूर या दोन्‍ही रेल्‍वेमार्गावरील वाहतूक ठप्‍प झाली आहे. या मालगाडीतून कोळसा वाहून नेण्‍यात होता.

अनेक गाड्यांचे मार्ग वळवले, काही गाड्या रद्द

२२८४५ पुणे-हटिया एक्‍स्‍प्रेस, १२२६१ सीएसएमटी-हावडा एक्‍स्‍प्रेस, १२१३९ सीएसएमटी-नागपूर या तीन एक्‍स्‍प्रेस गाड्या चांदूर बाजार ते नरखेड मार्गे वळवण्‍यात आल्‍या आहेत. २२८४७ विशाखापट्टनम-एलटीटी, १२६५६ चेन्‍नई-अहमदाबाद एक्‍स्‍प्रेस नागपूर-नरखेड-चांदूरबाजार- बडनेरामार्गे वळवण्‍यात आली आहे.

याशिवाय १११२२ वर्धा-भुसावळ पॅसेंजर, १२१४० नागपूर-सीएसएमटी एक्‍स्‍प्रेस धामणगाव ते नागपूर परत आणि रद्द, १२११९ अमरावती-नागपूर, ११०४० गोंदिया-कोल्‍हापूर महाराष्‍ट्र एक्‍स्‍प्रेस, ०१३७२ वर्धा-अमरावती, १७६४२ नरखेड-काचीगुडा, १११२१ भुसावळ-वर्धा, १२१०६ गोंदिया-सीएसएमटी, १२१३६ नागपूर-पुणे, १२१२० अजनी-अमरावती, १२१४० नागपूर-सीएसटीएम, ०१३७४ नागपूर-वर्धा या गाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत.

२०८१९ पुरी-ओखा वाडी-दौंड-मनमाड-जळगाव मार्गे, १२६५६ चेन्नई-अहमदाबाद नरखेड-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे, १२८३४ हावडा-अहमदाबाद पुलगाव-नागपूर-नरखेड-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे, १२८६० हावडा-सीएसटीएम नागपूर–चांदूर बाजार-बडनेरा मार्गे, १२१२९ पुणे-हावडा मार्गे बडनेरा-चांदूर बाजार-नागपूर, १२८४४ अहमदाबाद-पुरी बडनेरा-चांदूरबाजार-नरखेड-नागपूरमार्गे, १८०२९ एलटीटी-शालीमार बडनेरा-चांदूर बाजार-नागपूर मार्गे वळवण्‍यात आल्‍या.

२२९०५ ओखा-हावडा, १२१४५ एलटीटी-पुरी, १२८०९ सीएसटीएम-हावडा या गाड्या भुसावळ-खंडवा-इटारसी-नागपूर मार्गे वळवण्यात आल्या, १२१६० जबलपूर-अमरावती एक्‍स्‍प्रेस आणि निझामुद्दिन-भुसावळ एक्‍स्‍प्रेस नागपूर येथेच थांबविण्‍यात आली. १२६५५ अहमदाबाद –चेन्‍नई, २२७३८ हिसार-सिकंदराबाद एक्‍स्‍प्रेस या गाड्या अकोला-सिकंदराबाद मार्गे वळवण्यात आल्या. १२१०५ सीएसटीएम-गोंदिया, १२१३५ पुणे-नागपूर , २२१३८ अहमदाबाद-नागपूर, १८०२९ एलटीटी-शालिमार, ११०३९ कोल्हापूर-गोंदिया, १२८५९ सीएसटीएम-हावडा या गाड्या बडनेरा-चांदूरबाजार–नागपूर मार्गे वळवण्यात आल्या.

१२२८९ सीएसटीएम-नागपूर, १२८११ एलटीटी-हटिया, १२८३३ अहमदाबाद-हावडा, ०११४० मडगाव-नागपूर, १३४२६ सुरत-मालदा टाऊन या गाड्या भुसावळ-खंडवा-इटारसी-नागपूर मार्गे वळवण्यात आल्या. १२४०६ निजामुद्दीन-भुसावळ ही गाड्या इटारसी-खंडवा-भुसावळ मार्गे वळवण्यात आली. १२१३० हावडा-पुणे ही गाडी गोंदिया-बल्हारशाह-सिकंदराबाद-वाडी-सोलापूर-पुणे मार्गे वळवण्यात आली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *