Headlines

विद्यापीठातील क्वारंटाइन केंद्रांची जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून पाहणी

सोलापूर, दि. 2- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वस्तीगृह येथील क्वारंटाइन सेंटरला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि  सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज भेट देऊन पाहणी केली. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना व नागरिकांना येथील क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले आहे.  श्री. शंभरकर आणि श्री शिवशंकर यांनी या केंद्राला भेट देऊन येथील नागरिकांशी चर्चा केली. …

Read More

पूर्ण क्षमतेने सुरू नसलेल्या दवाखान्यांना नोटीस बजावणार

 सोलापूर, दि.30:- शहरातील बारा हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे तपासणीत आढळल्याने त्यांच्यावर नोटीस बजावण्यात यावी, यासाठी सोलापूर महानगरपालिकेला शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार आणि भरारी पथकाच्या प्रमुख उज्वला सोरटे यांनी दिली. सोलापूर शहरातील हॉस्पिटल रुग्णसेवा देतात की नाही याची तपासणी करण्यासाठी श्रीमती सोरटे यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त करण्यात आले आहे.  या पथकाने गेल्या दोन…

Read More

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवा-पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

सोलापूर, दि. 29 – जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांची माहिती द्यावी. त्यांच्यावर लक्ष ठेवावे, लक्षणे दिसल्यावर त्यांच्यावर उपचार करावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केल्या.कोरोनाच्या प्रार्दुभावावर विचार करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीशी  चर्चा केली. या बैठकीत त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीसांना या सूचना केल्या.               …

Read More

पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे तिला समजल की ती स्वतःच त्यातून बाहेर पडेल

                                                                                             आज जागतिक मासिक पाळी दिन… सकाळी सकाळीच घरातीलच एक…

Read More

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                     ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ Iवयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होईसुरुवात होतातू घाबरायचं नाही          MHM चे लय…

Read More

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही…

Read More

इचलकरंजी मधील मुस्लिम समाजाने निर्माण केला आदर्श

प्रतिनिधी – इचलकरंजीमधील मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन लोकार्पण केले.यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर उपस्थित आहे. COVID_19 च्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची सुमारे ३६ लाख रुपयांची रक्कम #WarAgainstVirus साठी उपयोगात…

Read More

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.२२: कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केल्या. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, तथापि, खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, गिरीश…

Read More

खासगी हौस्पिटल घेणार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सोलापूर, दि.२२-  कोरोना विषाणूने बाधित झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी शहर आणि जिल्ह्यातील दवाखाने ताब्यात घेण्यात येतील,  अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.                    ज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काल  खासगी रुग्णालया संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार खासगी दवाखान्यातील रुग्ण्सेवेचा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायद्यात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी…

Read More

रुग्णांबाबत माहितीसाठी डॉ.चौगुले यांची नियुक्ती

सोलापूर, दि.20 :- कोरोना विषाणूने बाधित असणाऱ्या रुग्णांबाबत सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी  सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ. राजेश चौगुले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. रुग्णांच्या संबंधितांनी त्याच्या सर्व प्रकारच्या शंका आणि समस्यासाठी डॉ. चौगुले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले आहे. डॉ.चौगुले यांचे संपर्क क्रमांक 9420761286,9923001444 असे आहेत.

Read More