Headlines

ब्रेकअपचं दु:ख दूर लोटत अभिनेत्री करतेय नटापटा, पाहणाऱ्यांची नजरच हटेना

[ad_1]

Shraddha Kapoor :  गेल्या अनेक दिवसांत बॉलीवूडमधील अनेक जोडप्यांचे ब्रेकअप झाले आहे. तरीही हे कपल्स मात्र त्यांच्या ब्रेकअपमधून बाहेर येऊन आपलं नवीन आयुष्य जगत आहेत. त्यातील बॉलीवूडची अशीच एक लोकप्रिय अभिनेत्रीही प्रेमात पडली होती आणि तिचे त्याच्यासोबतचे नाते लग्नापर्यंतही पुढे गेले होते. पण तिचे ब्रेकअप झाले आणि त्यांची कहाणी अधूरीच राहिली. 

पण आता हीच अभिनेत्री चांगलीच फॉर्ममध्ये असून आता तिही आपल्या अंदाजात समाजमाध्यमांवर चांगलाच धुमाकूळ घालते आहे. नुकताच तिने आपले एक हटके फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात तिचा हटके अंदाज पाहून सर्वच चाहते घायाळ झाले आहेत. 

अभिनेत्री शद्धा कपूर हिने नुकतेच तिचे नवीन फोटो शूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात तिने गुलाबी फेदर्सचा ट्रेडिशनल लुक परिधान केला आहे. ती या नव्या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत असून त्याच्या या फोटोवर चाहते घायाळ झाले आहेत. 

हे फोटोशूट तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर फाल्गूनी शेन पिकॉक यांच्यासाठी केले आहे. या लुकमध्ये तिने फाल्गुनी शेन पिकॉक स्टाईलमध्ये लेंहेंगा आणि ब्लाऊज घातला आहे. श्रद्धा कपूरच्या या लुकवर चाहते फिदा झाले असून तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. तिचा हा संपुर्ण लुक पेस्टल रंगातला आहे. काही चाहत्यांनी तिचे हे मोहक सौंदर्य पाहून अनेकांनी तिच्यावर चारोळीही लिहिल्या आहेत. 

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा प्रियकर छायाचित्रकार रोहन श्रेष्ठा यांच्या नात्यात काही महिन्यांपुर्वी दुरावा आला आहे. पण या दुःखातून सावरून तिने आपलं वर्क लाईफही सुरू केलं आहे. रोहन आणि श्रद्धा एकमेकांना चार वर्षे डेट करत होते. नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ते एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते. त्यांनी लग्नही करायचे ठरविले होते पण त्यांच्या नात्यात वादाची ठिणगी पडली आणि ते दोघं वेगळे झाले. त्यानंतर तो शद्धाच्याही अनेक फंगशन्सला हजेरी लावत नव्हता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *