Headlines

‘मुलाला हात लावण्याआधी, बापाशी बोल,’ शाहरुख खानचा समीर वानखेडेंना इशारा; Jawan चा ट्रेलर पाहून चर्चा

[ad_1]

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित ‘जवान’ (Jawan) चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांना ट्रेलर प्रचंड आवडला असून, नेटकरी हा चित्रपट सुपरहिट होईल असा विश्वास व्यक्त करत आहेत. चित्रपटातील शाहरुख खानचे डायलॉगही प्रेक्षकांना आवडत असून, त्यांची चर्चा सुरु झाली आहे. यातील एका डायलॉगची चांगलीच चर्चा रंगली असून, नेटकरी याचा संबंध एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याशी जोडत आहेत. समीर वानखेडे यांनी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केली होती. यानंतर समीर वानखेडे विरुद्ध शाहरुख खान असा संघर्षच रंगला होता. 

शाहरुख खान जवान चित्रपटात वडील आणि मुलं अशा दोन्ही भूमिकांमध्ये आहे, असं ट्रेलरमधून तरी दिसत आहे. या अॅक्शन चित्रपटात शाहरुख खानच्या तोंडी एक डायलॉग आहे ज्यामध्ये तो म्हणतो की ‘मुलाला हात लावण्याआधी, बापाशी बोल’ (Bete ko Hath Lagane Se Pehle Baap se Baat Kar). ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी याचा संबंध आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी जोडला आहे. 

शाहरुख खानचा हा डायलॉग म्हणजे अप्रत्यक्षपणे समीर वानखेडे यांच्यावर भाष्य करण्यात आल्याचा दावा काही नेटकरी आहेत. इतकंच नाही तर ट्विटरला #Baap हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 

नेमकं काय झालं होतं?

समीर वानखेडे यांनी एनसीबीत असताना 2 ऑक्टोबर 2021 रोजी क्रूझवरील कथित ड्रग्ज पार्टीवर कारवाई केली होती. या कारवाईत त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. यानंतर बराच गदारोळ झाला होता. आर्यन खान जवळपास एक महिना जेलमध्ये होता. अखेर 28 ऑक्टोबरला कोर्टाने आर्यन खानची सुटका केली होती. दरम्यान, आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुखकडे 25 कोटींची मागणी केली होती असा आरोप सीबीआयने केला आहे. 

दरम्यान, चित्रपटाबद्दल बोलायचं गेल्यास हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर रिजील झाल्यानंतर युट्यूबवर धुमाकूळ घालत असून, करोडो व्ह्यू मिळाले आहेत. 

अॅटलीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, शाहरुखसह नयनतारा, विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. तसंच दीपिका पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय प्रियामी, सानया मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर, योगी बाबू, रिद्धी डोगरा. संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक, लेहर खान आणि आलिया कुरेशी यांच्याही छोट्या भूमिका आहेत. 7 सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *