Headlines

बापरे! याला काय झालं? इमरान खानला पाहून चाहते चिंतेत

[ad_1]

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या ईदच्या उत्साहामध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी कल्ला केल्याचं पाहायला मिळालं. सलमान असो किंवा आमिर खान, अगदी शाहरुखही… प्रत्येकानंच आपलं कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या साथीनं ईद साजरी केली. 

कोरोनाचं संकट टळल्यानंतर निर्बंध मागे घेण्यात आले आणि त्याच क्षणी सणउत्सवांचे खरे रंग पुन्हा दिसू लागले. ईदच्या दिवशीही असंच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. (Eid celebrations)

पण, या साऱ्यामध्ये चाहते मात्र प्रचंड चिंतेत दिसले. कारण ठरलं ते म्हणजे अभिनेता इमरान खान याचा अचानक समोर आलेला फोटो. गेल्या बऱ्याच काळापासून इमरान मोठ्या पडद्यापासून दूर आहे. (Imran Khan)

काही निवडक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या अभिनेत्याच्या खासगी आयुष्यातही बरीच वळणं आली, ज्यानंतर त्यानं काही अंशी मोठ्या पडद्यावर येण्यापासून किंवा झगमगाटापासून दुरावाच पत्करला. 

हो, पण कौटुंबीक कार्यक्रम, काही खास मित्रांनी आयोजित केलेल्या समारंभांना मात्र तो हजेरी लावताना दिसला. यंदाचा ईद सण अशाच प्रसंगांपैकी एक. जिथं इमराननं मित्रपरिवासोबत हा सण साजरा केला. 

आमिरची लेक आयरा हिनं या क्षणांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्येच एके ठिकाणी इमरानसारखा दिसणारा कुणीतरी चाहत्यांच्या नजरेत आला. 

बरं, हा इमरानच आहे का? असा प्रश्नही चाहत्यांना पडला. कारण, त्याचं बदललेलं रुप हैराण करणारं होतं. इमरानला नेमकं झालं तरी काय? असेच प्रश्न नेटकरी करु लागले. 

चिंतेपोटी प्रश्नांचा भडीमार आयराच्या या पोस्टवर करण्यात आला. आता या सर्व प्रश्नांची उत्तरं खुद्द इमरानच देऊ शकतो. तूर्तास, त्याचं हे बदललेलं रुप पाहण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही, हेच खरं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *