Headlines

आयटक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ०१ जानेवारी २०२२ पासून कोल्हापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन

बार्शी / प्रतिनिधी – ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्वाच्या मागण्यांसाठी ग्रामविकास मंत्रालय आणि अर्थमंत्रालय एक दुसऱ्यावर जबाबदाऱ्या ढकलत आहेत. आंदोलनास मनाई करण्यात येते, मंत्री महोदयांची भेट होत नाही, चर्चा होत नाही. यातून ग्रामपंचायत कर्मचारी आर्थिक अरिष्टात ढकलला जात आहे म्हणून, ग्रामविकास मंत्री ना. हसनजी मुश्रीफ यांचे लक्ष्य वेधण्यासाठी नाईलाजाने कोल्हापूर येथील बिंदू
चौकात दि. ०१ जाने. २०२२ पासून दिल्ली स्थित शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार आयटक प्रणित राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने व्यक्त केला आहे.गंभीर प्रश्न खदखदत आहेत. मा. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याविषयी
विनंती असता त्यांच्याकडूनही कसलाच प्रतिसाद मिळाला नाही.

कर्मचा-यांना वेतनण श्रेणी, किमान वेतनाची फरक, किमान वेतन मिळण्यासाठी अडथळा करणारा २८ एपिल २०२० चा शासन निर्णय रद करा, मा. यावलकर समितीच्या शिफारसी नुसार लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध रद्द करा, १००%, राहणीमान भत्ता शासनाने द्यावा, गॅच्युईटीसाठी असणारी १० कर्मचाऱ्यांची आणि कमाल पन्नास हजार रूपयांची कमाल मर्यादेची अट रद्द करा, भनिनि खात्यात गा.पं. कर्मचाऱ्यांचा
हिस्सा मागील फरकासह जमा करा, दिपक म्हैसेकर समितीच्या अहवालानुसार ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना द्या, कायम स्वरूपी विमा योजना लागू करा, कोरोना काळात कार्यरत असतांना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाखाचे अर्थसाहय करा, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सेवत सामावून घ्या त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ नको.

पत्रकावर प्रा. कॉ. तानाजी ठोंबरे (अध्यक्ष), कॉ. नामदेव चव्हाण(सरचिटणीस), कॉ. ए.बी. कुलकर्णी (संघटन सचिव), कॉ. बबन पाटील (उपाध्यक्ष),. अँड. राहुल जाधव (सचिव), कॉ. श्याम चिंचणे (सचिव), कॉ. नामदेव गावडे,
कॉ. शिवाजी पाटील, कॉ. भिकाजी कुंभार , भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. सतिशचंद्र कांबळे आणि आयटकचे
कॉ. दिलीप पवार यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *