Headlines

Ayodhya Ram Mandir :अक्षय कुमार ते पवन कल्याण अयोध्या राम मंदिर निर्माणसाठी ‘या’ 8 कलाकारांनी केलं ‘इतकं’ दान!

[ad_1]

Celebrities donate for Ram Mandir : आज अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. यासाठी नेता- अभिनेता या सगळ्यांनी तिथे हजेरी लावली आहे. दरम्यान, यावेळी अक्षय कुमार, कंगणा रणौत, टाइगर श्रॉफ, हरिहरण, रजनीकांत, अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. त्यासाठी या सगळ्या कलाकारांना खास निमंत्रण देण्यात आलं होतं. आता चर्चा आहे सेलिब्रिटींनी दान केलेल्या रक्कमेची. चला जाणून घेऊया त्यांनी किती पैसे दान केलं. 

किती मिळालं दाण? 

PTI या न्यूज एजंसीला श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सांगितलं की आता पर्यंत 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. मात्र, अजुनही 300 कोटी रुपयांची गरज पडू शकते. अनेकांनी मंदिरासाठी दान केलं आहे. दान करणाऱ्या कलाकारांमध्ये अक्षय कुमार, अनुपम खेर आणि गुरमीत चौधरीसोबत अनेक कलाकारांनी मंदिर निर्माणमध्ये मदत केली आहे. 

2021 मध्ये अक्षय कुमारनं व्हिडीओ शेअर करत राम मंदिराच्या निर्माणसाठी दान करत छोटी सुरुवात केली याचा खुलासा केला आहे. त्यानं लोकांना देखील सांगितलं की कशा प्रकार ते योगदान करु शकतात. अक्षय कुमारनं लिहिलं की ‘खूप आनंदाची गोष्ट आहे की अयोध्येत आपल्या श्री रामच्या भव्य मंदिराची निर्मिती सुरु झाली. आता योगदान देण्याची आपली वेळ आहे. मी सुरुवात केली आहे, अपेक्षा आहे की तुम्ही देखील आमच्यासोबत एकत्र याल. जय सियाराम।’

अनुपम खेर यांनी 2023 मध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ते अयोध्या गेल्याचे दिसत होते आणि त्यांनी मंदिराच्या निर्माणची झलक दाखवली होती. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी देखील काही रक्कम दान केली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त प्रणिता सुभाषनं 1 लाख रुपये दान केले होते. 

हेही वाचा : …जेव्हा एकाच अभिनेत्यानं साकारली राम आणि सीतेची भूमिका; एकही डायलॉग नसतानाही भारावले होते प्रेक्षक

‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी देखील श्रीराम मंदिरासाठी दानं केलं. त्यांनी ट्वीट करत याची माहिती दिली होती की 1.1 लाख रुपयांचा चेक मंदिर निर्माणसाठी देण्यात आला होता. याशिवाय दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता पवन कल्याणनं 30 लाख रुपयांचे दान केले. दरम्यान, हेमा मालिनी, गुरमीत चौधरी, मनोज जोशीनं देखील दान केले असून त्यांनी किती रक्कम दान केली याचा खुलासा केला नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *