Headlines

औरंगाबाद विद्यापीठात ‘सीतामाते’च्या नृत्यावरुन वाद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक

[ad_1]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सव सुरु आहे. मात्र, हे युवक महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. एका नाटकात ‘सीतामाता’ साकारलेली तरुणी लावणी नृत्यावर नाचताना दिसत आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ( अभाविप ) हे नाटक बंद पाडत गोंधळ घातला आहे. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होते.

सोमवारी ( १७ ऑक्टोंबर ) युवक महोत्सव कार्यक्रमादरम्यान विद्यापीठाच्या स्टेज क्रमांक ३ वर नाट्यरंग सुरु होते. सीता आणि लक्ष्मण यांच्यातील संवाद सुरु असल्याचं दाखवण्यात येत होते. त्यात रामाच्या शोधासाठी लक्ष्मण रेषा आखून निघून जातो. मग, सीतामातेच्या भूमिकेत असलेली तरुणी ‘झाल्या तिन्ही सांजा’ या लावणीवर नाचताना दिसत आहे. हीच गोष्ट तेथील प्रेक्षकांना खटकली. तेव्हा उपस्थित असलेल्यांनी नाटक बंद पाडत घोषणाबाजी सुरु केली. तर, कलाकारांनी स्टेजवरून काढता पाय घेतला.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंना शिवसेनेतील बंड थोपवण्यात अपयश आलं?, रोहित पवार म्हणाले, “आमदार परत…”

या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. हिंदू देवी-देवतांची विटंबना केल्याचा आरोप ‘अभाविप’ केला आहे. यावरून मंगळवारी ( १८ ऑक्टोंबर ) ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे. तर, “हे नाटक कोणी लिहलं, कशापद्धतीने त्याचे सादरीकरण केले, याची चौकशी केली जाईल,” असे आश्वासन कुलगुरु येवले यांनी ‘अभाविप’ला दिलं आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *