Headlines

Auction झालं, खेळाडू ठरले, पण IPL होणार का? ICC च्या एका निर्णायाने BCCI चा खेळ बिघडणार

[ad_1]

IPL 2023 : आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमीयर लीग 2023 (IPL 2023) बाबत पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. 23 डिसेंबर म्हणजेच गेल्या शुक्रवारी आयपीएल 2023 ची मिनी ऑक्शन (Mini Auction) घेण्यात आली. ज्यामध्ये इंग्लंडचा युवा स्टार ऑलराऊंडर सॅम करन (Sam Curran) सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्सने (Punjab Kings) सॅमला 18.50 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं आहे. त्यामुळे चाहत्यांना आयपीएल (IPL) कधी एकदा सुरु होतेय, याची उत्सुकता लागली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदाच्या आयपीएलचा 16 वा सिझन आहे. 1 एप्रिलपासून या सिझनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यासोबतच बीसीसीआय (BCCI) यावेळी 74 दिवसांची आयपीएल खेळवण्याच्या विचारात आहे. मात्र आयपीएलच्या या प्लॅनिंगवर पाणी फेरलं जाऊ शकतं. 

बीसीसीआयच्या योजनेवर फेरलं पाणी

यंदाच्या आयपीएलमध्ये 10 टीम्स असल्याने बीसीसीआय 2023 चं आयोजन 74 दिवसांसाठी करू इच्छिते. मात्र त्यांची ही योजना किती प्रमाणात यशस्वी ठरेल, यावर प्रश्नचिन्ह आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2023 चा यंदाचा सिझन 60 दिवसांपर्यंत खेळवला जाऊ शकतो. 

1 एप्रिलपासून सुरु होणारी आयपीएलच्या स्पर्धेची फायनल 31 मे पर्यंत खेळवला जाईल. मात्र, अजून या स्पर्धेच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बीसीसीआय या टूर्नामेंट्सच्या डेट्सच्या बाबतीत लवकरच घोषणा करणार आहे. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे 60 दिवसांची होणार आयपीएल

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (2021-23) ची फायनल 7 जून रोजी ओव्हल मैदानावर खेळवली जाणार आहे. अशातच आयसीसीच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या 7 दिवसांपूर्वी आणि नंतर कोणत्याही स्पर्धेचं आयोजन करण्यास मनाई आहे. ज्यामुळे बीसीसीआयला केवळ 2 महिन्यांची वेळ आहे.

कसं आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित

भारताने चितगाव कसोटी जिंकली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला. त्यानंतर भारताने चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. आता ढाका कसोटीतही विजय मिळवून भारताने दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. आठ विजय आणि दोन ड्रॉसह भारताचे 58.93 टक्के गुण झाले आहेत. दक्षिण आफ्रिका 54.55 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलिया 76.92 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर दक्षिण आफ्रिका (54.55%) आणि श्रीलंका (53.33%) अनुक्रमे 3 आणि 4 वर भारताच्या अगदी मागे आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *