Headlines

सावन का महिना…! येत्या वर्षात श्रावण महिना लांबणार, इतके दिवस खावं लागणार व्हेज

[ad_1]

Year 2023 Shravan Month Know About It: नववर्ष 2023 सुरु होणार असून कोणता सण कधी याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे हिंदू पंचांगानुसार, पुढचं वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचा असणार आहे. म्हणजेच 2023 या वर्षात अधिक महिना असणार आहे. श्रावण महिना 30 ऐवजी 60 दिवसांचा असणार आहे. यामुळे चातुर्मास 4 महिन्यांऐवजी 5 महिन्यांचा असेल. हिंदू वर्षानुसार तिथी कमी अधिक असल्याने 11 दिवस घटतात. तसेच 3 वर्षात ही संघ्या 30 ते 33 होते. तेव्हा कमी झालेले दिवस एडजस्ट करण्यासाठी अधिक मास येते. तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला पुरुषोत्तम मास बोललं जातं. 2023 या वर्षात पुरुषोत्तम मास 18 जुलै 2023 ते 16 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे. त्यानंतर श्रावण महिना 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

अधिक मास का लागतो?

सूर्य वर्ष 365 दिवस आणि 6 तासांचं असतं. तर चंद्र वर्षे 354 दिवसांचं असतं. सूर्य वर्ष आणि चंद्रवर्षात 11 दिवसांचं अंतर असतं. हे अंतर कमी करण्यासाठी प्रत्येक तीन वर्षांनी एक अधिक मास असतो. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक तीन वर्षात एक अधिक मास असतो. 

अधिक मासात या बाबी लक्षात ठेवा

-अधिक मास हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णुची पूजा केली जाते. त्यामुळे अधिक मासाला पुरुषोत्तम मास संबोधलं जातं. या महिन्यात पूजा पाठ केल्याने तिप्पटीनं फळ मिळतं. पण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

– अधिक मासासत विवाह करू नये. या महिन्यात विवाह करणे अशुभ मानलं जातं. या महिन्यात विवाह केल्यास शारीरिक-मानसिक सुख मिळत नाही. जीवन निरागस होतं.

बातमी वाचा- Makar Sankranti 2023: मकर संक्रांती 14 की 15 जानेवारीला! जाणून घ्या नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त

– अधिक मासात नव्या कामाची सुरुवात करु नये. अन्यथा धनहानी होण्याची शक्यता असते. कामात यश मिळत नाही.

– अधिक मासात गुंतवणूक करू नये. प्रॉपर्टी दागिने खरेदीसाठी नवरात्रीपर्यंत वाट पाहावी. अधिक मासात घर बांधू नये.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *