Headlines

Salman Khan Birthday : 2023 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सलमान खान अडकणार लग्नबंधनात?

[ad_1]

मुंबई  : करिश्मा कपूरने (karishma kapoor) बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. करिश्माने वयाच्या अगदी १७व्य वर्षी  फिल्मी जगतात(bollywood industry) प्रवेश केला.  कपूर घराण्यातून अभिनयाचा वारसा घेत नव्वदीच्या दशक करिश्माने चांगलच गाजवलं.  तिने बॉलिवूड इंडस्ट्रीला एक-दोन नव्हे तर अनेक हिट चित्रपट दिले आहेत करिश्मा कपूरचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादात राहीलं.

तर दुसरीकडे सलमान खान आपला ५८ वा वाढदिवस साजर करत आहे.  सलमान हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या लग्नाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. सलमान खान आजपर्यंत सिंगल आहे. मात्र त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. सलमानचे चाहते त्याच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत. 

आता सलमानच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. असं म्हटलं जात आहे की, सलमान खान 2023 मध्ये लग्न करणार आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला या बातमीमागचं सत्य सांगणार आहोत. समोर आलेल्या बातम्यांनुसार, सलमान खानने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत लग्न करण्यासाठी होकार दिला आहे.  

मात्र एकटंच राहणं हे भाईजानच्या आयुष्यात लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या. मात्र त्यानंतर हे सगळे फोटो खोटे  असल्याचं समोर आलं. त्याचप्रमाणे आता करिश्मा कपूरसोबतच्या लग्नाच्या चर्चाही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. असंही म्हटलं जात आहे की, सलमान आणि करिश्मा २०२३मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.

दरम्यान करिश्माने शेअर केलेल्या फोटोंने सर्वाधिक लक्ष वेधले होते.या फोटोंमध्ये करिश्मा कपूर अभिनेता सलमान खानला मिठी मारताना दिसत आहे.दोघांच्या या फोटोवर बरेच लाईक्स आणि क्कॉमेंट्स येऊ लागले तसच ”दोघे एकत्र छान दिसता दोघे लग्नच करा ” असही काही चाहत्यांनी सुचवलं.

 एका चाहत्याने तर चक्क सलमान खानलाचं गळ घातली , ”सलमान सर कृपया करिश्माशी लग्न करा, तुम्ही दोघे खूप छान दिसता”.. त्यामुळे हे तर स्पष्ट झालं की, चाहत्यांना सलमान आणि करिश्मा या दोघांना रिअल लाईफ कपल(real life couple) म्हणून बघायचे आहे. तर एका चाहत्याने ही जोडी २०२३ मध्ये लग्न करणार असल्याची अटकळ बांधली. मात्र ही अटकळ पुर्णपणे खोटी आहे.

सलमान आणि करिश्मा कपूरच्या लग्नाच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. अनेक महिन्यांपासून त्यांच्या लग्नाच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. असं असलं तरी सलमान आणि करिश्मा एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्री व्यतिरिक्त कोणतंच नातं नाही.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *