Headlines

ऐन कामाच्या वेळी Phone Network ने धोका दिला ? बदला ही सेटिंग, खराब नेटवर्क मध्येही करता येईल कॉल

[ad_1]

नवी दिल्ली: Wi-Fi Calling: फोनमध्ये खराब नेटवर्क असल्यास कॉल करताना खूप त्रास होतो. महत्वाची कामं सुद्धा यामुळे रखडू शकतात. तुम्हालाही दररोज या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर वाय-फाय कॉलिंग तुमची मदत करेल. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही खराब नेटवर्कमध्येही स्पष्ट व्हॉइस कॉल करू शकाल. ही खास युक्ती अँड्रॉइड तसेच आयफोन युजर्ससाठी आहे. वाय-फाय कॉलिंगसाठी तुम्हाला वाय-फायमध्ये प्रवेश आवश्यक आहे. यानंतर फोनचे नेटवर्क खराब असले तरीही तुम्ही आरामात कॉल करू शकाल. Android स्मार्टफोनवर वाय-फाय कॉलिंग कसे सुरू करावे ते पाहा.

वाचा: पासवर्ड आठवतच नाहीये ? काळजी नको, पासवर्डशिवाय Unlock करा Mobile, पाहा ट्रिक्स

Google Pixel डिव्हाइसेस:

सर्वात आधी फोनच्या सेटिंगमध्ये जा. नेटवर्क आणि इंटरनेट पर्यायावर टॅप करा नंतर कॉल आणि एसएमएस पर्यायावर जा. – वाय-फाय कॉलिंग पर्याय शोधा आणि उघडा. Wi-Fi कॉलिंग वापरण्यासाठी टॉगल चालू करा.

वाचा: 6000mAh बॅटरी, 108MP कॅमेरा आणि जबरदस्त प्रोसेसरसह येणाऱ्या ‘या’ फोन्सची किंमत १५ हजारांपेक्षा कमी

OnePlus युजर्स :

फोनच्या सेटिंग्जमध्ये दिलेल्या मोबाइल नेटवर्क पर्यायावर जाऊन Sim 1 वर टॅप करा. नंतर वाय-फाय कॉलिंगचा पर्याय शोधा आणि उघडा. वाय-फाय कॉलिंग चालू करा. येथे तुम्ही उपलब्ध नेटवर्कमध्ये वाय-फाय आणि सेल्युलर कॉलिंगचे प्राधान्य देखील सेट करू शकता.

Samsung आणि बहुतेक Android डिव्हाइसेस

प्रथम फोन अॅप उघडा. अंतर वरच्या उजव्या बाजूला दिलेल्या Three Dots वर टॅप करा. सेटिंग्ज उघडण्यासाठी टॅप करा. येथे तुम्हाला वाय-फाय कॉलिंगचा पर्याय दिसेल. ते उघडा आणि टॉगल चालू करा.

iPhone वर वाय-फाय कॉलिंग कसे सक्रिय करावे ?

सर्वप्रथम सेटिंगमध्ये दिलेल्या फोन ऑप्शनवर जा. नंतर वाय-फाय कॉलिंग पर्यायावर टॅप करा. वाय-फाय कॉलिंग चालू करण्यासाठी टॉगल चालू करा. जर वाय-फाय कॉलिंग सेवा उपलब्ध असेल, तर तुम्हाला स्क्रीनवर ऑपरेटरच्या नावापुढे वाय-फाय दिसेल.

वाचा: 8GB RAM ऑफर करणाऱ्या ‘या’ फोनची किंमत १२,००० पेक्षा कमी, पाहा कुठे मिळतेय ऑफर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *