Headlines

Astro Tips: विवाहित महिलांनी ‘या’ दिवशी धुवावेत केस; अन्यथा होतील वाईट परिणाम

[ad_1]

Astro tips for married women : हिंदू धर्मात (Hindu Dharm) आठवड्यातील 7 दिवसांसाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचं पालन केल्याने तुमच्या जीवनात समृद्धी राहते आणि अनेक अडचणींपासून मुक्तता होते, असंही मानलं जातं. विवाहित महिलांसंदर्भात (married women) देखील हिंदू शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये महिलांनी केस धुण्याच्या (Hair wash) दिवसाबाबत खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. 

धर्माच्या शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, विवाहित महिलांनी खास दिवशी केस धुवू नयेत. या दिवसांमध्ये केस धुणं योग्य नसून ते निषिद्ध असल्याचं सांगितलंय. जर महिलांनी याचं पालन केलं नाही त्याचा महिलेसह संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो. 

आठवड्यातील विविध दिवसांत केस धुतल्याने होणारे परिणाम

सोमवार– धर्म शास्त्रानुसार, विवाहित महिलांनी सोमवारी केस धुवू नयेत. ज्या महिलांच्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती अशुभ आहे अशा महिलांनी सोमवारी केस धुवू नयेत. 

मंगळवार– मंगळवारी विवाहित महिलेने केसं धुणं योग्य मानलं जात नाही. असं केल्याने घरामध्ये नकारात्मकता वाढू शकते. जर केस धुण्यासाठी पर्याय नाही तर स्त्रीने डोके धुण्यासाठी गुसबेरीच्या पावडरचा वापर करावा.

बुधवार– लग्न झालेल्या महिला बुधवारी केस धुवू शकतात. ज्या महिलांना लहान भावंडं आहेत त्यांनी या दिवशी केस धुणं टाळलं पाहिजे. शिवाय केस धुण्यापूर्वी चार ते पाच तुळशीची पाने केसांना लावा.

गुरुवार– लग्न झालेल्या महिलांनी गुरुवारी केस कधीही धुवू नयेत. असं म्हणतात की, एखाद्या विवाहित स्त्रीने गुरुवारी केस धुतले तर त्यामुळे तिच्या पतीचं वय कमी होऊ शकतं. मात्र जर तुम्हाला गुरुवारी केस धुवावे लागले तर बेसनात थोडी हळद मिसळा आणि लावा.

शुक्रवार – लग्न झालेल्या महिलांसाठी केस धुण्यास शुक्रवारचा दिवस सर्वात शुभ मानला जातो. शुक्रवारी केस धुतल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. या परिस्थितीत कधीही आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही.

शनिवार – महिलांनी शनिवारी कधीही केस धुवू नयेत. असे केल्याने शनिदेवाचा कोप होत, असल्याचं मानलं जातं. तरी तुम्हाला शनिवारी केस धुवायचे असतील तर केसांना कच्चे दूध लावून केस धुवा.

रविवार – केस रविवारी देखील धुणं योग्य मानलं जात नाही. मात्र या दिवशी सुट्टी असल्याने अनेक महिला रविवारीच केस धुतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *