Headlines

Guess Who : ‘या’ फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

[ad_1]

Guess Who :  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखायचा आहे.  

फोटोत काय? 

हा फोटो बॉलिवूड अभिनेत्याचा (Bollywood Actor) आहे. हा या अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो आहे. या फोटोत अभिनेता लहानपणी त्याच्या कुत्र्यासोबत फोटोत दिसत आहे. फोटोत हा चिमुकला त्यांच्या घरातल्या पाळीव कुत्र्याकडे लक्ष देत आहे. या दरम्यान त्याचा हा फोटो काढण्यात आला होता. 

फोटोत हा चिमुकला फ्रॉक घालून बसला आहे. आणि कुत्र्याकडे बघत आहे. या चिमुकल्याला पाहून अभिनेत्याला ओळखणे खुपच कठीण आहे. कारण तो अजिबात ओळखता येत नाही. तुम्ही या अभिनेत्याचे कितीही मोठे फॅन असलात, तरी तुम्हाला तो ओळखता येणार नाही आहे.

ओळखलंत का?

हा अॅक्टर बॉलिवूडचा (Bollywood Actor) आघाडीचा अभिनेता आहे. त्याने बॉलिवूडच्या अनेक सिनेमात काम केले आहे. त्याची अनेक चित्रपट आतापर्यंत गाजली आहेत. सध्या तो ब़ॉलिवूडमध्ये शाहरूख, सलमान सारख्या अभिनेत्यांना चांगलीच टक्कर देतोय. 

‘हा’ आहे अभिनेता?

दरम्यान तुम्ही अजूनही या अभिनेत्याला ओळखलं नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, कार्तिक आर्यन (kartik aaryan) सध्या बॉलिवूडचा टॉपचा हिरो आहे, त्याने हिट्सच्या बाबतीत शाहरुख-सलमानसारख्या सुपरस्टार्सला मागे टाकले आहे. यापूर्वी कार्तिकच्या भूल भुलैया 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्याचवेळी OTT वर नुकताच प्रदर्शित झालेला कार्तिकचा ‘फ्रेडी’ चित्रपटही प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता.

सध्या कार्तिकच्या (kartik aaryan) वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘शेहजादा’मध्ये (shehzada) दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने कार्तिक आणि क्रितीचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघे एकत्र ख्रिसमस साजरा करताना दिसत होते. कार्तिकच्या या चित्रपटाची आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *