Headlines

Asia Cup 2022: आशिया कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत, पाहा Photo

[ad_1]

मुंबई : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) ची सुरुवात 27 ऑगस्ट पासून होणार असून  11 सप्टेंबर दरम्यान सामने रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टक्करकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडिया आशिया कपमध्ये नवी जर्सी घालून खेळणार आहे. त्याची झलकही समोर आली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे चाहते आशिया चषकसाठी खूप उत्सुक आहेत.  भारतीय क्रिकेट संघ आशिया कपसाठी तयारी करत आहे. अंतरिम प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासह संघाचे खेळाडू घाम गाळत आहेत. 27 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने आशिया चषकाची सुरुवात होणार आहे. भारतीय संघ 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. अ गटात भारतीय संघाशिवाय पाकिस्तान आणि हाँगकाँगचे संघ आहेत.

आशिया चषकात भारतीय संघ नव्या जर्सीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. खरे तर बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये टीम इंडिया नवीन जर्सी घालून खेळायला येते. भारतीय संघ जेव्हा जेव्हा ICC आणि ACC स्पर्धा खेळायला येतो तेव्हा त्या स्पर्धेचा लोगो टी-शर्टवर बनवला जातो. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने जर्सी घालून एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली, ज्यानंतर त्याचा फोटो व्हायरल होत आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अवेश खान.

स्टँडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *