Headlines

Asia Cup 2022: आशिया कप स्पर्धेत नव्या टीमची एन्ट्री; भारत-पाकिस्तानच्या गटात समावेश

[ad_1]

मुंबई : दोन दिवसांनंतर सुरू होणाऱ्या आशिया कप 2022 सिझनमध्ये आता एका नवीन टीमचा प्रवेश झाला आहे. या टीमने क्वालिफायर फेरी जिंकून आपलं स्थान निश्चित केलं आहे. ही टीम दुसरी तिसरी कोणी नसून हाँगकाँग आहे. या टीमला भारत-पाकिस्तानच्या ‘अ’ गटात स्थान मिळालं आहे.

आशिया कप 2022 चा सिझन शनिवारपासून सुरू होणार आहे. पहिला सामना ‘ब’ गटातील श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक स्पर्धा होणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहतायत.

यंदा आशिया कपच्या स्पर्धेत 6 टीम असतील, ज्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान ‘अ’ गटात आहेत. तर ‘ब’ गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत. पात्रता फेरीतून एक टीम निवडला जाणार होता. अशा स्थितीत ही टीम हाँगकाँग ठरली आहे.

हाँगकाँग, यूएई, कुवेत आणि सिंगापूर या चार टीममधील क्वालिफायर सामने 21 ऑगस्टपासून सुरू झाले. पात्रता फेरीतील विजयी टीम भारत-पाकिस्तान गटात असणार होता. सर्व टीम्सने 3-3 सामने खेळलेत. ज्यामध्ये हाँगकाँगने सर्व सामने जिंकून क्वालिफायमध्ये स्थान पटकावलं आहे.

हाँगकाँगचा पहिला टीम इंडियाविरूद्ध

टीम इंडियाचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. त्याचवेळी हाँगकाँगचा या स्पर्धेतील पहिला सामना भारतीय संघाविरुद्ध होणार आहे. भारताचा हा दुसरा सामना असेल, जो 31 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. यानंतर हाँगकाँगला 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *