Headlines

Shubman Gill : जा जीजूकडून काहीतरी शिक…; रणजी ट्रॉफीमध्ये फ्लॉप झाल्यानंतर Arjun Tendulkar ला अजब सल्ला!

[ad_1]

Arjun Tendulkar troll : भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) सध्या रणजी ट्रॉफीची स्पर्धा खेळतोय. रणजीच्या स्पर्धेमध्ये (Ranji Trophy) तो गोव्याचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय. सध्या छत्तीसगड विरूद्ध गोवा (Chhattisgarh vs Goa) असा रणजी सामना सुरु असून या सामन्यामध्ये अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) फेल झाल्याचं दिसून येतंय. यामुळे सोशल मीडियावर (Social media troll) अर्जुनला चांगलच ट्रोल (Troll) करण्यात आलं आहे. 

यावेळी अर्जुन तेंडुलकरला सध्या सोशल मीडियावर स्टार फलंदाज शुभमन गिलच्या (Shubman Gill) नावाने ट्रोल करण्यात येतंय. जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण काय आहे.

सोशल मीडियावर ट्रोल झाला Arjun Tendulkar

गोवा विरूद्ध छत्तीसगड यांच्यामध्ये रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेचा सामना सुरु आहे. गुरुवारी या सामन्याचा दुसरा दिवस होता. या सामन्यात छत्तीसगडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय फायदेशर ठरला असून छत्तीसगडने 9 विकेट्स गमावत 531 रन्स केले आहेत. 

छत्तीसगडच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यावेळी गोव्याचा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर देखील काहीच करू शकला नाही. अर्जुनने 12 ओव्हरमध्ये 34 रन्स देऊन एकंही विकेट घेतली नाही. ज्यानंतर शुभमन गिलच्या नावाने अर्जुनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी एका चाहत्याने, आपल्या जिजाकडून काही शिकण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर ही कमेंट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतेय. 

सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि शुभमन डेटींग करत असल्याची चर्चा

अर्जुन तेंडुलकरची मोठी बहीण सारा तेंडुलकर हिचं नाव शुभमन गिलसोबत जोडण्यात येतं. शुभमन गिललाही फॅन्स सारा तेंडुलकरच्या नावाने चिडवत असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर सारा आणि शुभमन एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. 

भर स्टेडियममध्ये साराच्या नावाने शुभमनला चिडवलं (Shubman Gill Teased By Sara Name)

नुकत्यात झालेल्या एका सामन्यात शुभमनला चाहत्यांनी साराच्या नावाने चिडवल्याचं समोर आलं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हीडिओमध्ये चाहते म्हणतायत की, ‘हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो’. शुभमन गिलला साराच्या नावाने डिवचण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. चाहते सुभमनला साराच्या नावाने चिडवण्याची एक संधी सोडत नाहीत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *