Headlines

हयातीचा दाखला सादर करण्याबाबत निवृत्तीवेतन धारकांना आवाहन

सोलापूर, दि.28 (जिमाका):- सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयाकडून जे निवृत्तीवेतन घेत आहेत अशा निवृत्तीवेतन धारकांनी तसेच कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक 1 नोव्हेबर 2021 रोजी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र निवृत्तीवेतन अदा करणाऱ्या बँकेत जाऊन स्वाक्षरी करावी व बँकेमार्फत दिनांक 20 नोव्हेबर 2021 रोजीपर्यत हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रुपाली कोळी यांनी केले आहे.

तसेच निवृत्तीवेतन धारक जीवन प्रमाणपत्र या प्रणालीचा वापर करुन डिजीटल पध्दतीने हयातीचे प्रमाणपत्र सादर करु शकतात.ज्या निवृत्तीवेतनधारकांचे हयातीचे दाखले वेळेत सादर होणार नाहीत. त्यांचे माहे डिसेंबर 2021 व त्यापुढील निवृत्तीवेतनाबाबत शासन नियमानुसार कार्यवाही केली जाईल. जिल्ह्यातील सर्व राज्यशासकीय निवृत्तीवेतन धारकांनी कुटूंबवेतन धारकांनी हयातीचे प्रमाणपत्र वेळेत सादर करावे अस, आवाहनही जिल्हा कोषागार अधिकारी कोळी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *