Headlines

anxiety among Shinde group MLA due to late cabinate expansion said ncp leader Eknath Khadse शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमदार अस्वस्थ; मंत्रिमंडळ विस्तारावरुन एकनाथ खडसेंचं विधान, म्हणाले, “सर्व आमदार तर…”

[ad_1]

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार मंत्रिमंडळाची वाट पाहत असल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये केलं आहे. “मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे बाहेर पडू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत” असे खडसे यांनी म्हटले आहे.

१२० कोटींच्या कर्जामुळे रितेश-जेनेलिया अडचणीत? १६ उद्योजकांना डावलून देशमुखांच्या कंपनीला प्राधान्य दिल्याचा भाजपाचा आरोप

भाजपा आमदार गिरीश महाजनांनी एक हजार कोटींचे काम रद्द केल्याने सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता. या विस्ताराला तीन महिने उलटुनही अद्याप दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी सरकारकडून हालचालींना वेग आला आहे.

“…तर आकाशातून पाणी टाकू का?” पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

दरम्यान, आज विधानभवनात उद्योग मंत्री उदय सामंत, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या वाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *