Headlines

अनुपम खेर केव्हाच ‘बाबा’ का होऊ शकले नाहीत? पत्नीकडूनच यामागचं कारण उघड

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) यांनी वयाची सत्तरी गाठली. कॅन्सरसारख्या आजाराला नमवून किरण खेर जीवनाची लढाई जिंकताना दिसल्या. जेव्हाजेव्हा त्या प्रेक्षकांसमोर आल्या, त्या प्रत्येक क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर असणारी लकाकी आणि हास्य सर्वांची मनं जिंकून गेली. 

किरण खेर आणि अभिनेते अनुपम खेर यांच्या वैवाहिक नात्यावरही कायमच सर्वांच्या नजरा खिळल्या. एक पत्नी म्हणून किरण सातत्यानं पतीची साथ देताना दिसल्या. पण, त्यांच्या आणि अनुपम यांच्या नात्यात केव्हाच स्वत:चं मूल नव्हतं. एका मुलाखतीत खुद्द किरण यांनीच यासंबंधीचा उलगडा केला. (Anupam kher kirron kher married relationship kids)

‘असं नव्हतं, की आम्ही प्रयत्नच केला नाही. सिकंदरला (किरण खेर यांच्या पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा) बहिण- भाऊ असावेत असं आम्हालाही वाटत होतं, आम्ही प्रयत्नही केला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यापर्यंत आम्ही पोहोचलो. पण, सर्व प्रयत्न अपयशी ठरले. कोणत्याच गोष्टीचा काहीच फायदा झाला नाही’, असं त्या म्हणाल्या.

सिकंदर आपल्याला आपल्या वडिलांप्रमाणेच वागवतो, आपल्यावर प्रेमही करतो असं सांगताना मी जर म्हटलं की मला स्वत:च्या मुलाची उणीव भासत नाही तर, ते खोटं असेल. मी यासाठी काहीच करु शकत नाही, असं खुद्द अनुपम खेर एका मुलाखतीत म्हणाले होते. 

अनुपम खेर किरण यांचे दुसरे पती… 
किरण खेर यांचं पहिलं लग्न व्यावसायिक गौतम बैरी यांच्याशी झालं होतं. हे नातं अवघे 6 महिने टिकलं. सिकंदर हा किरण आणि गौतम यांचाच मुलगा. किरण गौतमपासून विभक्त झाल्या तेव्हा सिकंदर फारच लहान होता. 

अनुपम खेर यांचंही हे दुसरं लग्न. 1979 मध्ये त्यांचं लग्न मधुमालती नावाच्या मुलीशी झालं होतं. हे लग्न अनुपम यांनी फक्त कुटुंबाखातर केलं होतं. यामध्ये त्यांचा विचार घेण्यात आला नव्हता. 

भुतकाळातील आयुष्य विसरून अनुपम आणि किरण खेर हे दोघंही एका नव्या नात्यात बांधले गेले. जवळपास 37 वर्षांहून अधिक काळापासून ते एकमेकांची निभावत आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *