Headlines

अन् नाना पाटेकर यांचा पारा चढला; Welcome 3 साठी निवड न होताच संतप्त स्वरात म्हणाले…

[ad_1]

Nana Patekar on Welcome 3 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘वेलकम 3’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात संजय दत्त देखील दिसणार आहे. अक्षयच्या वाढदिवसानिमित्तानं निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा करत मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या चित्रपट खूप मोठी कास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. पण यावेळी वेलकम या चित्रपटात अभिनेता नाना पाटेकर दिसत नाही आहेत. 

नाना पाटेकर या चित्रपटात दिसणार नाही हे कळल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काही नेटकरी चित्रपटाची नवीन कास्ट पाहून आनंदी आहेत. वेलकम फ्रेंचायझीच्या आधीच्या दोन्ही भागात नाना पाटेकर दिसले होते. त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे खूप जास्त मनोरंजन झाले. या फ्रेंचायझीमधील उदय शेट्टी ही भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. दरम्यान, आता नाना पाटेकर यांनी या चित्रपटात नसण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

नाना पाटेकर यांना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओत नाना पाटेकर यांना वेलकम 3 विषयी प्रश्न विचारण्यात आला की ते चित्रपटाचा भाग का नाही आहेत? त्यावर उत्तर देत नाना पाटेकर यांनी सांगितलं की ‘त्यांना वाटलं की मी जुना झालो आहे. त्यामुळे आम्हाला चित्रपटातून काढलं असेल.’ तर दुसरीकडे विवेक अग्निहोत्री यांच्याकडे इशारा करत म्हणाले, ‘आणि त्यांना वाटतं की आम्ही अजून जुने झालो नाहीत. त्यामुळे त्यांनी आम्हाला घेतलं… इतकं हे सोप गणित आहे.’ 

नाना पाटेकर यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते लवकरच वॅक्सिन वॉरमध्ये दिसणार आहेत. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरसाठी मुंबईत एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संपूर्ण कास्ट पाहायला मिळाली होती. या चित्रपटात कोरोना काळात वॅक्सिन बनवण्याची शर्यतीत भारताचे योगदान दाखवण्यात येणार आहे की कशा प्रकारे भारतानं मदत केली. या चित्रपटात अनुपम खेर, सप्तमी गौडा, पल्लवी जोशी, राइमा सेन, निवेदिता भट्टातचार्य आणि अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

दरम्यान, वेलकम 3 च्या कास्ट विषयी बोलायचे झाले तर त्यात अक्षय कुमार, रवीना टंडन, सुनील शेट्टी, जॅकलीन फर्नाडिस, दिशा पटानी, लारा दत्ता, परेश रावला, संजय दत्त, जॉनी लिव्हर, तुषार कपूर, अरशद वारसी, श्रेयस तलपडे, मीका सिंह, राजपाल यादव, दलेर मेहंदी सारखे कलाकार आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *