Headlines

‘मी पण गेलेलो सुपरहिट सिनेमा पाहायला, अर्ध्यातून बाहेर पडलो!’ नानांचा निशाणा ‘जवान’ की ‘गदर 2’?

[ad_1]

Nana Patekar : बॉलिवूड दिग्गज अभिनेता नाना पाटेकर लवकरच विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटात दिसले होते. त्यांचा हा आगामी चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी देखील या कार्यक्रमात त्यांनी कोणाचंही नाव न घेता हिट चित्रपटांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरून असं म्हटलं जात आहे की शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि सनी देओलच्या ‘गदर 2’ या दोन्ही चित्रपटांना टार्गेट केलं आहे. 

नाना पाटेकर यांनी कालच्या ट्रेलर लॉन्चवेळी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड चित्रपटांवर वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलत असताना नाना पाटेकर म्हणाले की ‘अलीकडेच सध्याचा हिट चित्रपट पाहायला मी चित्रपटगृहात गेलो होतो. पण, खरं सांगू का? तो चित्रपट मी पूर्णपणे पाहू शकलो नाही. पुन्हा तेचतेच विषय दाखवून प्रेक्षकांना गृहीत धरलं जात आहे. वेगळे, विषय दाखवले जात नाहीत. त्यानंतर नाना पाटेकर हे थोडक्यात ‘जवान’ आणि ‘गदर 2’ या चित्रपटाविषयी बोलत असल्याचे म्हटले जाते. तर काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांनी ‘गदर 2’ च्या प्रीमियरला हजेरी लावली होती. 

इतकंच नाही तर नाना पाटेकर यांना ‘वेलकम 3’ या चित्रपटात न दिसण्याविषयी देखील विचारण्यात आले होते. त्यावेळी नाना पाटेकर म्हणाले की ‘त्यांना वाटलं की मी जुना झालो आहे. त्यामुळे मला चित्रपटातून काढलं असेल.’ तर दुसरीकडे विवेक अग्निहोत्री यांच्याकडे इशारा करत म्हणाले, ‘आणि त्यांना वाटतं की मी अजून जुना झालो नाही. त्यामुळे त्यांनी मला घेतलं… इतकं हे सोप गणित आहे.’ 

हेही वाचा : सी व्ह्यू, खिडकीतून दिसणारा आसमंत आणि… सोनाक्षी सिन्हाचं 4000 Sqft चं घर पाहिलं का?

दरम्यान, ‘वेलकम 3’ विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात एक मोठी स्टार कास्ट दिसणार आहे. अक्षय कुमार, रवीना टंडन, सुनील शेट्टी, जॅकलीन फर्नाडिस, दिशा पटानी, लारा दत्ता, परेश रावला, संजय दत्त, जॉनी लिव्हर, तुषार कपूर, अरशद वारसी, श्रेयस तलपडे, मीका सिंह, राजपाल यादव, दलेर मेहंदी सारखे कलाकार आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *