Headlines

Amitabh Bachchan यांना रस्त्यावरच्या व्यक्तीला का मागावी लागली लिफ्ट? Video Viral

[ad_1]

Amitabh Bachchan Bike Riding Video Viral : मेगास्टार आणि महानायक अमिताभ बच्चन आजही कामात व्यस्त असतात. वयाच्या 80 वर्षीही ते थांबले नाही, त्यांचं काम सातत्याने सुरु आहे. कामाप्रती त्यांची अपार श्रद्धा आहे. ते सोशल मीडियावरही खूप सक्रीय असतात. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात या श्रीमंत व्यक्तीला रस्त्यावरील एका अनोखळी माणसाकडून लिफ्ट मागण्याची वेळ आली. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, त्यांना कार सोडून बाईकवर जाण्याची वेळ का आली?

…म्हणून त्यांनी लिफ्ट मागितली

अमिताभ बच्चन हे त्यांच्या वक्तशीरपणामुळे कायम ओळखले जातात. ते कामाच्या ठिकाणी कधीही उशिरा पोहोचत नाही. त्यांना लेट गेलेलं बिलकुल आवडतं नाही. मुंबई वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांसोबत अनेक वेळा राजकीय नेते असो बॉलीवूडमधील कलाकारांनाही बसला आहे. 

‘सेटवर पोहचायला उशीर झालाय, सोडतो का?

या मुंबईतील वाहतुकीचा बिग बी यांनाही फटका बसला. त्यांना शूटिंगसाठी उशीर होत होता म्हणून त्यांनी रस्त्यावरील एका अनोखळी माणसाकडे लिफ्ट मागितली. खुद्द बिग बींनी सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवरील त्यांचा अधिकृत अकाऊंटवर त्या व्यक्तीचे आभार मानले. ही पोस्ट करताना त्यांनी त्या व्यक्ती जी ओळख करुन दिली. ती वाचून त्यांची नात नव्या नवेलीलाही (Navya Naveli Nanda) हसू आवरलं नाही. (amitabh bachchan Why did have to ask unknown person for a lift big b riding bike video viral on Social media trending now)

काय म्हणाले बिग बी…?

त्या व्यक्तीचा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी त्याचे आभार मानले. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं की, ”राइडसाठी थँक्स buddy..तुम्हाला माहिती नाही, पण तुम्ही मला कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवले. जलद आणि न सुटणाऱ्या ट्रॅफिक जाम टाळून..धन्यवाद capped, shorts आणि yellowed T-shirt मालक…”

पोस्टवर चाहत्यांचा कमेंटचा पाऊस 

या पोस्टवर नव्या नवलेलीने हसणारे आणि हॉटवाले इमोजी टाकले आहेत. त्याशिवाय रोहित रॉयनेही कमेंट केली आहे. तो म्हणाला की, ”अमित जी, तुम्ही पृथ्वीवरील सर्वात छान मित्र आहात, तुमच्यावर आम्ही प्रेम करतो.” 

दरम्यान दुखापतीतून बरे होऊन बिग बी यांनी नुकतीच कामाला सुरुवात केली आहे. प्रोजेक्य केच्या सेटवर त्यांना दुखापत झाली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *