Headlines

Alia Bhatt Baby: आलिया-रणबीरसाठी मुलगी ठरणार लकी! काय सांगतात ग्रह-तारे वाचा

[ad_1]

Alia Bhatt’s Baby Girl: बॉलिवूड स्टार कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) यांच्या बाळाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. अखेर आलिया भट्टनं 6 नोव्हेंबर 2022 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीर आता आई-वडिलांच्या भूमिकेत आले आहेत. आता मुलीच्या जन्मानंतर ज्योतिषांनी आपलं भाकीत वर्तवलं आहे. चंद्रग्रहणाच्या आधीच प्रसुती झाल्याने या दोघांच्या चाहत्यांनी आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास असलेल्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 6 नोव्हेंबर 2022, रविवार रेवती नक्षत्रावर मुलीचा जन्म झाला आहे. महर्षि कपि गुरुकुलचे संस्थापक ज्योतिषाचार्य वेदाश्वपति आलोक अवस्थी यांनी ग्रहांच्या स्थितीबाबत सांगितलं आहे. आलिया आणि रणबीर यांच्या मुलीच्या कुंडलीतील ग्रहतारे काय सांगतात? याबाबत विश्लेषण केलं आहे. 

ज्योतिषशास्त्रानुसार दुपारी 12 च्या आसपास आलियाने मुलीला जन्म दिला. यावेळी चंद्र गोचर मीन राशीत असल्याने या मुलीची रास मीन असणार आहे. तर गुरु ग्रह याच राशीत ठाण मांडून असल्याने गजकेसरी योग आहे. जन्म रेवती नक्षत्रात झाल्याने राहु कन्या नवांशमध्ये आहे, शुक्र तूळ राशीत आहे. ग्लॅमरचं विश्व राहू या ग्रहाशी निगडीत आहे. त्यामुळे या आलिया-रणबीरची मुलगी फिल्म इंडस्ट्रीत करिअर घडवेल असं दिसतं. त्याचबरोबर चित्रपटात नाव कमवेल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. 

आलियाप्रमाणेच बिझनेस वूमन बनेल. त्याचबरोबर इमोशनल आणि सेंसेटिव्ह असणार आहे. आलिया आणि रणबीरची मुलगी दोघांसाठी खूप भाग्यवान ठरेल. ज्योतिषाच्या मते, 2029 पासून आलिया आणि रणबीरच्या करिअरमध्ये जबरदस्त बदल दिसून येईल, त्यामागे त्यांची मुलगी असेल.

Rashi Parivartan: शुक्र, बुध आणि सूर्य वृश्चिक राशीत करणार प्रवेश, या राशींना मिळणार लाभ

आलिया भट्टच्या मुलीची लग्न कुंडलीत धनु राशी आणि मंगळ सप्तमात असल्यामुळे मांगलिक योगही तयार होत आहे. अशा परिस्थितीत तिच्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहील. या व्यतिरिक्त, अंकशास्त्रानुसार जन्म दिनांक 6 आहे आणि या अंकावर शुक्राचं अधिपत्य आहे. शुक्र स्वराशी असलेल्या तूळ राशीत आहे. त्यामुळे आलियाची मुलगी चर्चेत राहणार आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *