Headlines

ajit pawar slams cm eknath shinde group minister abdul sattar

[ad_1]

राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही बाजूंकडून सोडली जात नाही. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या टीकेवर आज अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच, वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरूनही अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.

“महाविकास आघाडीतला मुंडकं खाणारा डायनासॉर”

अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीत मुंडकं खाणारा डायनासॉर आहे, असं म्हणत सूचक शब्दांत टीका केली होती. “आमच्या नेत्याला आम्ही बोललो की शिवसेना वाचवायची तर तुम्हाला पुढाकार घ्यावाच लागेल.महाविकास आघाडीमध्ये मुंडकी खाणारा डायनासॉर आहे”, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्यांचा रोख अजित पवारांच्या दिशेने असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात आज प्रसारमाध्यमांनी पुण्यात अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्यावरून परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे.

पंकजा मुंडेंना शिंदे गटात घेण्याचा विचार करणार का? अब्दुल सत्तार म्हणाले, “एखाद्या नेत्यामुळे…”

“असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही.आज बेरोजगारी, महागाईचा प्रश्न आहे. त्याला महत्त्व न देता, त्या विषयांवर चर्चा न होण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. बेरोजगारी वाढली, वेदान्तसारखा प्रकल्प गेला.दोन लाख तरुणांचा रोजगार गेला. त्याविषयी त्यांनी बोलावं. इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, असं माझं सत्ताधाऱ्यांना आवाहन आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“ते भुजबळांचं वैयक्तिक मत”

दरम्यान, सरस्वती देवीच्या फोटोविषयी छगन भुजबळांनी केलेल्या विधानाविषयी विचारणा करताच अजित पवारांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “भुजबळांचं ते वैयक्तिक वक्तव्य आहे. हे पक्षानं सांगितलं आहे. प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. ती पक्षाची भूमिका नाही”, असं अजित पवार म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *