Headlines

ajit pawar reaction on order reinstate dismissed employees who attack sharad pawar house spb 94

[ad_1]

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ११८ कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे सरकारकडून खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांसमोरच मोठी घोषणा, हात जोडून म्हणाले “मी लवकरच…”

काय म्हणाले अजित पवार?

“शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून कशाही पद्धतीने वागायला लागले आहे. कशापद्धतीने निर्णय घेणं सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने तेव्हाच्या परिस्थितीनुसार हा निर्णय घेतला होता. आता शिंदे सरकारने बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्हाला त्यावर काहीही बोलयाचे नाही. महाराष्ट्रातील जन सुज्ञ आहे. आता जनतेनेच यांचा कारभार कशापद्धतीने चालला आहे आणि किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं जात आहे, याचा विचार आता जनतेनेच करावा”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा – दसरा मेळाव्यातील भाषणावरून केसरकरांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले “डुक्कर संजय राऊतांच्या तोंडी…”

बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत

एसटी महामंडळाच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कर्मचाऱ्यांचे पगार, एसटीसाठीच्या उपाय योजना, सातवा आयोग, महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णयही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *