Headlines

‘बापाची हतबलता अन्…’, रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!

[ad_1]

Ravindra Berde Death : ज्येष्ठ मराठमोळे अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde)  यांचं काल निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. घशाच्या कर्करोगाने ते गेले अनेक वर्ष त्रस्त होते. मागील काही वर्षात त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, घरी आणल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचे सख्खे बंधू होते. 1965 च्या काळात मराठी चित्रपटामध्ये आगमन केलेल्या रवींद्र बेर्डे यांनी अनेक चित्रपटामध्ये आपली छाप सोडली आहे. रवींद्र बेर्डे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील शोक व्यक्त केला जातोय. अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) भावूक पोस्ट लिहिली आहे.

काय म्हणाली हेमांगी कवी?

रविंद्रदादा बेर्डे गेल्याची बातमी कळली आणि मी थेट कोल्हापुरात पोचले. 2008 साली ‘धुडगूस’ चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात केलं होतं. त्यात मी रविंद्रदादांच्या मुलीचं काम केलं. तोपर्यंत मी त्यांना विनोदी भूमिकांमध्ये पाहीलं होतं. पण धुडगूस मधला त्यांनी साकारलेला बाप, निव्वळ कमाल. हा प्रसंग माझा सर्वात आवडता आहे. यातली बापाची हतबलता, चुकीच्या घरात मुलीचं लग्न लावून दिल्याचा पश्चाताप, आता आपण मुलीसाठी काहीच करू शकत नसल्याच्या जाणिवेने कासावीस झालेला चेहरा हे सगळं काहीही न बोलता अगदी मोजक्या एक्सप्रेशनमध्ये दाखवणं खूप कठीन असतं जे त्यांनी सहजगत्या केलं होतं. मला आठवतंय हे सगळं वन 
टेकमध्ये झालं होतं. जो नट इतकी वर्ष हसवत आला त्याला असं रडताना पाहून काळीज पिळवटून निघतं. माझं तरी निघतं… ज्यांना लहानपणापासून पडद्यावर पाहत आलो त्यांच्याबरोबर स्क्रिन शेअर करायला मिळणं खुप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, असं हेमांगी कवीने म्हटलं आहे.

चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक, हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला अशा तब्बल 300 हून अधिक चित्रपटामध्ये रवींद्र बेर्डे यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तर काही हिंदी सिनेमांच्या माध्यमातून देखील त्यांनी आपलं नावाची मोहर सोडली आहे.  

दरम्यान, रवींद्र बेर्डे यांना 1995 मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचार केलयानंतर 2011 मध्ये रवींद्र बेर्डे यांना कर्करोगाचं निदान झाल्याचं समोर आलं. बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अनेक चित्रपटात एकत्र अभिनय केला होता. त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *