Headlines

जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर नेमकं कसं जगतोय? सलमान खानने केला खुलासा “इतकी भीती…”

[ad_1]

Salman Khan on Death Threat: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) गँगस्टरच्या निशाण्यावर असून त्याला जाहीर धमक्या देण्यात आल्या आहेत. त्याला वारंवार मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. दरम्यान, नुकतंच सलमान खानने ‘आप की अदालत’ (Aap Ki Adalat) या कार्यक्रमात यासंबंधी भाष्य केलं आहे. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर नेमकं तो कशाप्रकारे सर्व गोष्टी हाताळत आहे याचा अनुभवही त्याने शेअर केला आहे. 

“असुरक्षित असण्यापेक्षा सुरक्षा असणं उत्तम. हो मला सुरक्षा देण्यात आली आहे. आता मला रस्त्यावर सायकलं चालवणं किंवा कुठे एकटं जाणं शक्य नाही. यापेक्षाही जास्त जेव्हा वाहतूक कोंडी झालेली असते तेव्हा इतकी सुरक्षा असते, वाहनांमुळे लोकांना त्रास होत असतो. लोक माझ्याकडे एक कटाक्ष टाकत असतात. गंभीर धमकी असल्यानेच सुरक्षा देण्यात आली आहे,” असं सलमानने म्हटलं आहे. 

“जे काही मला सांगितलं जात आहे, त्या सर्व गोष्टी मी करत आहे. किसी का भाई, किसी की जान चित्रपटात एक डायलॉग आहे, त्यानुसार तुम्हाला 100 वेळा भाग्यवान असावं लागतं. पण मला फक्त एकदाच भाग्यवान ठरायचं आहे. त्यामुळे मला फार काळजी घ्यावी लागणार आहे,” असंही सलमानने यावेळी सांगितलं. 

पुढे सलमानने सांगितलं की “मी प्रत्येक ठिकाणी पूर्ण सुरक्षेत जात आहे. मला माहिती आहे की, जे काही व्हायचं ते कितीही प्रयत्न केला तरी होणार आहे. मला वाटतं देव आहे. याचा अर्थ मी उघडपणे फिरायचं असा नाही. आता माझ्याभोवती खूप सारे शेरा आहेत. माझ्याभोवती इतक्या बंदुका आहेत की कधीकधी मलाच भीतीच वाटते”.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *