Headlines

लग्नानंतर वर्षभरात झाले विभक्त, सोशल मीडियावरून काढले नवऱ्याचे फोटो आणि आडनाव? अभिनेत्रीनं केला खुलासा

[ad_1]

Dalljiet Kaur Divorce with Second Husband : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीत तिच्या खासगी आयुष्यासोबतच तिच्या कामाविषयी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगत असते. दिलजीत आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावरून तिचा पती निखिल पटेलसोबतचे अनेक फोटो काठून टाकले आहेत. इतकंच नाही तर बायोमधून तिनं पटेल हे आडनाव देखील काढून टाकलं आहे. आता लोकांना असं वाटतंय की एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांच्या घटस्फोट झाला की काय?

लक्षवेधी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी मार्च महिन्यात दलजीतनं निखिल पटेलसोबत दुसरं लग्न केलं. त्या दोघांचं लग्न चांगलंच चर्चेत होतं. कारण त्याचं लग्न हे कोणत्याही शाही लग्नापेक्षा कमी नव्हतं. निखिल केन्यात राहतो. लग्नानंतर दलजीत त्याच्यासोबत तिथेच शिफ्ट झाली. मात्र, आता असं वाटतंय की त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस येण्या आधीच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. दिलजीतनं आतापर्यंत ते दोघं विभक्त झाले आहेत याची घोषणा केली नाही. 

दरम्यान, दलजीत आणि निखिल यांची भेट दुबईत एका न्यू ईयर पार्टीत झाली होती. त्यानंतर दलजीत आणि निखिल बराचवेळ रिलेशनशिपमध्ये होते आणि 18 मार्च 2023 रोजी त्यांनी लग्न केलं. निखिलसोबत दलजीतचं हे दुसरं लग्न केलं. तिचं पहिलं लग्न हे 2009 मध्ये शालीन भनोटसोबत झालं होतं. दोघांनी ‘कुलवधु’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. 2014 मध्ये दलजीतनं त्यांच्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

भारतात येण्याचं काय आहे खरं कारण?

दलजीत कौरनं ‘ईटाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं, “माझा डेब्यू चित्रपट ‘दशमी’ प्रदर्शित झाला आहे आणि नुकताच त्याचा प्रिव्ह्यू ठेवण्यात आला. मोठ्या पडद्यावर स्वत:ला पाहण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यासोबत हा खूप सुंदर अनुभव होता. मी इथे प्रीमियरसाठी आली आहे, मात्र भारतात येण्याचे महत्त्वाचे कारण हे माझ्या वडिलांच्या गुडघ्याची सर्जरी आहे. ते बंगळुरूमध्ये आहेत.”

हेही वाचा : ‘लोक म्हणतात तुझे Thighs खूपच…’ अभिनेत्री मृणाल ठाकूरने सांगितला ‘सेक्सी’ शब्दाचा अर्थ!

दलजीतनं ‘मानो या ना मानो’, ‘छूना है आसमान’, ‘सपना बाबुल का… बिदाई’, ‘नच बलिए 4′,’ इस प्यार को क्या नाम दूं’, ‘स्वरागिनी’, ‘मां शक्ति’, ‘कयामत की रात’ आणि ‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’ मी काम केलं. ती अखेरीस ‘ससुराल गेंदा फुल 2’ या मालिकेत दिसली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *