Headlines

भारताच्या पराभवानंतर अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर म्हणाले, ‘काहीच नाही’

[ad_1]

Amitabh Bachchan trolled over his tweet : काल वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला. यात भारतीय क्रिकेट टीम अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियानं भारताला 6 विकेटनं पराभूत करत विश्व कप जिंकला. भारत ही मॅच हरल्यानंतर अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर त्यांना चांगलच ट्रोल करण्यात येत आहे. 

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून इतकंच लिहिलं की ‘काही तर नाही’ (‘कुछ भी तो नहीं’). अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटला पाहताच नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. एक नेटकरी म्हणाला ‘सगळ्यात आधी तर तुम्ही तुमचा टीव्ही बंद करा.’ दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं की ‘तुम्ही म्हणाला होतात जेव्हा पण तुम्ही मॅच पाहतात तेव्हा भारत मॅच हरतो. मग अशात तुम्हाला वर्ल्ड कपमध्ये तुम्ही रिस्क घ्यायला नको होती.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘इथे भारत पराभूत झाला आणि तुम्ही बोलतात की काहीही नाही.’ आणखी एक नेटकरी म्हणाला की ‘सर, मग काही बोलू नका. हरलो ना.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आशा आहे की तुम्ही मॅच पाहिली नाही. तिसरा नेटकरी म्हणाला, तुम्ही मॅच पाहत आहात का सर?’

पुढे आणखी काही नेटकऱ्यांनी म्हटलं की फक्त एक गेम. तुम्हाला फक्त इतकंच करायचा आहे की’ ही मॅच पाहायची नव्हती.’ अनेकांनी अमिताभ बच्चन यांना मॅच न पाहण्याची विनंती करत आहे. तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुम्ही मॅच पाहिली आणि भारत हरला.’ इतकंच नाही तर आणखी एक नेटकरी ट्वीट  करत अमिताभ यांना प्रश्न विचारत म्हणाला की ‘अमिताभ बच्चन सर असं वाटतंय की तुम्ही भारत-ऑस्ट्रेलिया मॅच पाहत आहात. त्यामुळे कृपया तुम्ही टीव्ही बंद कराल का?’ 

हेही वाचा : तुम्ही पनवती आहात? अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांची वर्ल्ड कप फायनल न पाहण्याची विनंती

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. त्यात दीपिका पदुकोण, रणबीर कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य. याशिवाय शाहरुख खान, आशा भोसले यांनी देखील हजेरी लावली होती. अमिताभ यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते प्रभासच्या ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटात दिसणार आहेत. रजनीकांत यांच्यासोबत देखील अमिताभ हे स्क्रिन शेअर करणार आहेत. मात्र, अजून त्यांच्या चित्रपटाचं नाव ठरलेलं नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *