Headlines

ऐश्वर्याशी नव्हे, ‘या’ 20 वर्षे मोठ्या अभिनेत्रीसोबत अभिषेकला करायचं होतं लग्न; तीन दशकांपूर्वीच केलेलं प्रपोज

[ad_1]

Abhishek – Aishwarya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी ही खूप लोकप्रिय आहे. त्या दोघांना एक मुलगी असून आराध्या असे तिचे नाव आहे. ते तिघेही आनंद आयुष्य जगताना दिसतात. अभिषेक हा त्याची पत्नी ऐश्वर्यावर किती प्रेम करतो हे सगळ्यांना ठावूक आहे. तो अनेकदा कॅमेऱ्यासमोर तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतो. दरम्यान, एका कार्यक्रमात अभिषेकनं खुलासा केला की 70-80 च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्रीवर त्याचा जीवदडला होता. त्या अभिनेत्रीचं नाव झीनत अमान असं आहे. झीनत या आज 72 वर्षांच्या असल्या तरी त्यांच्यातील ग्रेस आणि सुंदरताही कमी झालेली नाही. 

अभिषेकनं तर झीनत अमान यांच्यावर असलेलं प्रेम आणि त्यासोबत लग्नासाठी प्रपोज करण्याची एक धम्माल स्टोरी आहे. त्याविषयी त्यानं एका कार्यक्रमात सांगितले होते. ही गोष्ट अभिषेक हा पाच वर्षांचा होता तेव्हाची आहे. अभिषेक वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत हिमाचल प्रदेशमध्ये त्यांच्या शूटिंगसाठी गेला होता. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत झीनत अमान या मुख्य भूमिकेत दिसल्या. 

चित्रपटाच्या सेटवर अभिषेक हा त्याचे वडील अमिताभ यांच्यासोबत रहायचा. त्यावेळी झीनत अमान अभिषेकसोबत नेहमीच खेळायच्या. (दूरदर्शन)वरच्या रंगोलीनं दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकला झीनत यांच्यावर क्रश देखील होते. तेव्हा अभिषेकनं त्यांच्याकडे लग्नाची मागणी घातली होती. हे ऐकल्यानंतर तिथे उपस्थित टीम आणि क्रू मेंबर्स हसू लागले. त्यावेळी झीनत यांनी अभिषेकला सांगितलं की तू आधी मोठा हो मग तुझ्याशी करेन.’  

दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, याच पटकथेला वेगळ्या पद्धतीनं दााखवलं आहे. एक दिवस डिनरनंतर जेव्हा झीनत अमान या त्यांचं शूट संपवून त्यांच्या रुमकडे जात होत्या. तेव्हा अभिषेकनं निरागसपणे त्यांना विचारलं, तुम्ही कोणासोबत झोपणार आहात? जेव्हा झीनत यांनी उत्तर दिलं की एकटं झोपणार तेव्हा अभिषेकला आश्चर्य झाले. 

हेही वाचा : VIDEO : ‘करण जोहर घरात फूट पाडतो’, वरुण धवनचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप

लहानमुलगा असल्यानं अभिषेक बच्चननं एकटं झोपण्याविषयी माहित नव्हतं. यामुळेच त्यानं निरागसपणे झीनत अमान यांना हा प्रश्न विचारला की तो त्यांच्यासोबत झोपू शकतो का. त्यावर झीनत या मस्करी करत म्हणाल्या की ‘थोडा मोठा हो मग.’[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *