Headlines

अभिनेत्री रिया चक्रवर्ती या बिझनेसमनच्या प्रेमात? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

[ad_1]

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ब्रोकरेज फर्म जेरोधाचे संस्थापक निखिल कामथ आणि रिया चक्रवर्ती एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा जोरदार सुरु आहेत. अलीकडेच अभिनेत्री तिचा कथित बॉयफ्रेंड निखिल कामथसोबत पुन्हा एकदा स्पॉट झाली आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे चर्चेत आली होती रिया चक्रवर्ती 
अलीकडेच अब्जाधीश बिझनसमन निखिल कामथसोबत एका पार्टीत दिसली. ती त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसली होती, तर निखिल पुढच्या सीटवर बसला होता. रिया आणि निखिलने काळ्या रंगाचे मॅचिंग कपडे परिधान केले होते.  रियाने काळ्या रंगाचा स्टायलिश ड्रेस घातला होता तर निखिल कॅज्युअल कपड्यांमध्ये सुंदर दिसत होता.

कोण आहे रिया चक्रवर्तीचा नवा बॉयफ्रेंड निखिल कामथ?
निखिल कामथ हे व्यावसायिक जगतात मोठं नाव आहे. तो भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक आहेत. त्याची एकूण संपत्ती सध्या 28,000 कोटी रुपये इतकी आहे. 8,000 रुपयांच्या नोकरीतून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. 2010 मध्ये निखिलने त्याचा भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत जेरोधाची सुरुवात केली.

घटस्फोटित आहे निखिल कामथ 
निखिल कामथने 2019 मध्ये अमांडा पूर्वांकरासोबत लग्न केलं. पण 2021 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचं नातं संपुष्टात आलं. असं म्हटलं जातं की, तो  निखिल कामथ 2021 च्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला तेव्हा डेट करत होतां.

काही काळापूर्वी मीडियामध्ये अशाही बातम्या आल्या होत्या की, २०२० मध्ये निखिलला डेट करायला सुरुवात करणारी मानुषी छिल्लर आता निखिलपासून वेगळा झाला आहे. ‘न्यूज18’च्या रिपोर्टनुसार, निखिल रिया चक्रवर्तीला डेट करत असल्याच्या बातम्यांदरम्यान अभिनेत्रीने हे पाऊल उचललं. याशिवाय या अफवा असलेल्या कपलने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो देखील केलं आहे. तर दुसरीकडे रिया आणि निखिल एकमेकांसोबत अनेकदा अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट होताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *