Headlines

अभिनेत्री कंगना राणौत 2024 मध्ये प्रसिद्ध बिझनेसमनसोबत अडकणार लग्नबंधनात?

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने इंडस्ट्रीत खूप नाव कमावलं आहे. कंगना रणौतने 15 वर्षांपेक्षा जास्त काळ तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कंगना राणौतच्या अनेक चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंगना रणौत तिच्या फिल्मी करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते.

आता कंगना राणौतच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, एका ट्विटमध्ये असा दावा केला जात आहे की, कंगना रणौत पुढच्या वर्षी 2024 मध्ये लग्न करणार आहे. कंगना राणौतचा भावी पती बिझनेसमन असल्याचंही सांगण्यात आलं आहे. चला तर जाणून घेऊया कंगना राणौतच्या लग्नाची संपूर्ण बातमी नेमकी काय आहे.

कमाल आर खानने केलं हे ट्वीट
अभिनेता कमाल आर खान उर्फ ​​केआरके ट्विटरवर खूप सक्रिय असतो. चित्रपटांच्या समीक्षणासोबतच तो बॉलीवूड स्टार्सबद्दल आपलं मत व्यक्त करत असतो. आता कमाल आर खानचं हे ट्विट चर्चेचा विषय बनलं आहे. वास्तविक, केआरकेचं नवीन ट्विट कंगना राणौतच्या लग्नाबद्दल आहे. KRK ने ट्विट करून लिहिलं आहे की,, ‘ब्रेकिंग न्यू: अभिनेत्री कंगना रणौत डिसेंबर 2023 मध्ये एका बिझनेसमनसोबत एंगेजमेंट करणार आहे.

एप्रिल 2024 मध्ये ती लग्न करणार आहे. त्यामुळे आधीच तिचं  अभिनंदन. उल्लेखनीय आहे की केआरके अनेकदा बॉलिवूड स्टार किंवा त्याच्या चित्रपटाबद्दल ट्विट करत असतो. आपल्या ट्विटमुळे तो अनेकदा अडचणीतही आला आहे.

कंगना रनौतचं वर्कफ्रंट
कंगना राणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती ‘तेजस’, ‘इमर्जन्सी’ आणि ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. कंगना रणौत शेवटची 2022 मध्ये रिलीज झालेल्या ‘धाकड’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला. उल्लेखनीय म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर स्टारर चित्रपट ‘टिकू वेड्स शेरू’ कंगना राणौतने निर्मित केला होता. अशा प्रकारे कंगना राणौतने प्रॉडक्शनमध्ये प्रवेश केला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *