Headlines

अभिनेत्री दिशा पटानीचे वडील करणार राजकारणात प्रवेश, म्हणाले…

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचे (Disha Patani) वडील जगदीश सिंह पटानी (Disha Patani Father Jagdish Singh Patani)  लवकरच राजकारणात प्रवेश करू शकतात. त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची सर्व तयारी सुरू आहे. जगदीश सिंह यापूर्वी यूपी पोलिसात होते त्यांनी आता तिथे राजीनामा दिला आहे. आता ते बरेली शहराच्या महापौरपदाची निवडणूक लढवू शकतात, असे म्हटले जात आहे. जगदीश सिंग हे बरेली शहरात बऱ्याच दिवसांपासून कार्यरत आहेत.

जगदीश सिंग निवडणूक लढवणार असल्याची चर्चा बरेली शहरात ठिकठिकाणी दिसू लागल्यावर त्यांच्या नावाची आणि छायाचित्रांसह अनेक होर्डिंग्ज दिसू लागल्या आहेत. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिशाचे वडील जगदीश सिंह पटानी म्हणाले की, काही पक्षांनी त्यांना उमेदवारी देऊ केली आहे. मात्र, जगदीश सिंह अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नसून ते आपले सर्व पर्याय पाहत आहेत. (Disha Patani Father Jagdish Singh Patani May Contest For Mayor Of Baraily) 

बातमीची लिंक : आलियानंतर ‘या’ कारणामुळे बिपाशा बासू नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, पाहा काय म्हणाले नेटकरी

दिशा पटानीबद्दल सांगायचे झाले तर तिने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिशा सगळ्यात शेवटी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसली होती. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. आता दिशा ‘योद्धा’ आणि ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटात दिसणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *