Headlines

Abdul Sattar Abuse Supriya Sule: “…याचा अर्थ आम्ही शिव्या मुकाट्याने…”; आत्याला शिवी देणाऱ्या सत्तारांवर रोहित पवार संतापले | Abdul Sattar Abused Supriya Sule NCP MLA Rohit Pawar Reacts scsg 91

[ad_1]

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसहीत अन्य पक्षाच्या महिला नेत्यांनी या शिवराळ भाषेविरोधात आक्षेप घेतल्यानंतर आता सुप्रिया याचे भाचे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्तार यांना थेट इशाराच दिला आहे. रोहित पवार यांनी ट्वीटरवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देताना सध्या राज्यात एकनाथ शिंदे गटाबरोबर सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीलाही सवाल विचारला आहे.

पाहा >> संतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral

नेमकं घडलं काय?
औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.

नक्की वाचा >> अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: “सत्तेची मस्ती जिरवणार, धडा शिकवल्याशिवाय…”; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

रोहित पवार काय म्हणाले?
सुप्रिया यांना कृषीमंत्र्यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रोहित यांनी दोन ट्वीट करत यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. “कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही.सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही. महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं?” असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला आहे.

“सामान्य जनतेचा विचार न करता आपला वैयक्तिक ‘बदला’ घेण्यासाठी कोणी खोक्यांची लेनदेण करून तुम्हाला गद्दारी करण्यास भाग पाडलं व तुम्ही सत्तेचे लाभार्थी झालात. आता कृषिमंत्री झालाच आहात तर वादग्रस्त विधाने करण्याऐवजी ओला दुष्काळ जाहीर करून संकटातील शेतकऱ्याला आधी धीर द्या,” असा सल्लाही रोहित यांनी दिला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबुब शेख यांनी प्रसारमाध्यमांसाठी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी या प्रकरणासंदर्भात एक व्हिडीओ जारी करत राज्यभरामध्ये सत्तार यांचे पुतळे जाण्याचं आवाहन केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *